शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

नागपुरात कोरोना संशयित आठ रुग्ण दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 23:29 IST

बुधवारी दिवसभरात २८ कोरोना संशयितांची नोंद झाली आहे. परंतु बाधित देशातील प्रवासाची पार्श्वभूमी व पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अशा आठच रुग्णांना मेयो, मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. गेल्या आठ दिवसात सर्वात कमी रुग्ण आज दाखल झाले.

ठळक मुद्देकमी रुग्णामुळे मेयो, मेडिकलला दिलासा : चार दिवसात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत आहे. बंद करण्यात आलेल्या शाळा-महाविद्यालये व जमावबंदीचा फायदा दिसून येऊ लागला आहे. परंतु पुढील १४ दिवस महत्त्वाचे आहेत. अधिक खबरदारी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. बुधवारी दिवसभरात २८ कोरोना संशयितांची नोंद झाली आहे. परंतु बाधित देशातील प्रवासाची पार्श्वभूमी व पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अशा आठच रुग्णांना मेयो, मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. गेल्या आठ दिवसात सर्वात कमी रुग्ण आज दाखल झाले.कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागपूरकर एकवटल्याचे चित्र आहे. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने केलेल्या सकारात्मक प्रयत्नांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे गेल्या दोन दिवसांत संशयित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. चार दिवसांत एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही. यामुळे आरोग्य सेवा देणाऱ्यांवरचा ताण काही प्रमाणात कमी झाला आहे. नागपुरात आतापर्यंत १५९ संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. १२३ संशयितांना भरती करून उपचार करण्यात आले. यातील ११६ नमुने तपासण्यात आले असून तब्बल ११२ नमुने निगेटिव्ह आले आहेत. मंगळवार १७ मार्च रोजी २२ नमुने तपासण्यात आले. यात अकोला जिल्ह्यातील एक, मेयोमधील सात, मेडिकलमधील १०, यवतमाळमधील एक व गडचिरोलीमधील तीन नमुन्यांचा समावेश होता. हे सर्व नमुने निगेटिव्ह आले.बुधवारी २८ संशयित रुग्ण समोर आले. परंतु आठच रुग्णांना दाखल करून घेण्यात आले. यातील एक पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेला २३ वर्षीय पुरुष व एक २० वर्षीय तरुणी आणि अमेरिकेतून प्रवास करून आलेली २३ वर्षीय युवती, अशा एकून तीन संशयित रुग्णांना मेडिकलच्या वॉर्ड क्र. २५ मध्ये भरती करण्यात आले. तर मेयोच्या वॉर्ड क्र. २४ मध्ये पाच संशयितांना दाखल करण्यात आले. यातील दोघे पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेले तर तिघांची बाधित देशातून प्रवास करून आल्याची पार्श्वभूमी आहे.आतापर्यंत मेडिकलमध्ये ७४ तर मेयोमध्ये ३४ संशयितमेडिकलमध्ये आतापर्यंत ७४ संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले. यात तीन रुग्ण पॉझिटिव्ह आले. या तिन्ही रुग्णांवर वॉर्ड क्र. २५मध्ये उपचार सुरू आहेत. तर मेयोमध्ये आतापर्यंत ३४ संशयित रुग्ण दाखल झाले असून यातील एक पॉझिटिव्ह आला आहे. वॉर्ड क्र. २४ मध्ये उपचार सुरू आहेत.छत्तीसगडमधून सर्वाधिक नमुनेमेयो, मेडिकल सोडल्यास नागपूरबाहेरून सर्वाधिक नमुने छत्तीसगडमधून आले. या राज्यातून आलेल्या १९ नमुन्यात एकही कोरोना बाधित आढळून आलेला नाही. यवतमाळ जिल्ह्यातून आतापर्यंत १२ नमुने आलेत. यात तीन नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. चंद्रपूरमधून चार, वर्धेमधून तीन, अमरावतीमधून दोन, सेवाग्राममधून एक, अकोल्यामधून तीन, गोंदियामधून एक, बुलडाण्यामधून एक, खामगावमधून तीन, गडचिरोलीमधून तीन व मध्यप्रदेशातून आठ नमुने आले आहेत. हे सर्व नमुने निगेटिव्ह आले.मेडिकलमधील एक डॉक्टर व्हेंटिलेटरवरमेडिकलच्या एका डॉक्टरची अचानक प्रकृती खालवल्याने त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागात या डॉक्टरची ड्यूटी लावण्यात आली होती. चार दिवसांपूर्वी ताप, सर्दी व खोकल्याची लक्षणे आढळून आल्याने त्यांचे नमुने तपासण्यात आले. यात ते निगेटिव्ह आले. परंतु आज अचानक प्रकृती खालवल्याने एका खासगी इस्पितळात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. धक्कादायक म्हणजे, मेडिकलकडून पुन्हा त्या डॉक्टरचे नमुने मेयोला पाठविण्यात आले होते. परंतु यापूर्वी नमुने निगेटिव्ह आल्याने मेयोच्या प्रयोगशाळेने नमुने घेण्यास नकार दिला. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांना नमुने तपासणीचे आदेश द्यावे लागल्याचे समजते.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलnagpurनागपूर