शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिल्लीचे सीएम अरविंद केजरीवाल यांना दिलासा, १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर
2
“मोदींनी मान्य करावे की आता सत्तेत येत नाहीत”; पवार, ठाकरेंच्या ऑफरवर नाना पटोले थेट बोलले
3
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
4
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
5
“नरेंद्र मोदी लटकता आत्मा, आमचे पवित्र आत्मे त्यांच्यासोबत जाणार नाही”; संजय राऊतांचा पलटवार
6
"यूपीत इंडिया आघाडीचे वादळ, नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत", राहुल गांधींचा हल्लाबोल
7
देशातील पहिला डिजिटल भिकारी राजूचे Heart Attack ने निधन, QR कोडद्वारे मागायचा भीक
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates: काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा आमच्यासोबत याः नरेंद्र मोदी
9
काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा शिंदे, अजितदादांसोबत या; PM मोदींची उद्धव ठाकरे, शरद पवारांना खुली 'ऑफर'
10
'ज्या व्यक्तीचा...'; नरेंद्र मोदींच्या ऑफरवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
सलमान-अक्षयचे सिनेमे फ्लॉप का होताएत? श्रेयस तळपदेने दिलं उत्तर; म्हणाला, 'लोक थकले...'
12
“अरे बापरे! शरद पवारांचे अंतःकरण किती उदार आहे”; देवेंद्र फडणवीसांचा मिश्किल टोला
13
Slone Infosystems IPO Listing: ३ दिवसांमध्ये ७०० पटींपेक्षा अधिक सबस्क्रिप्शन, आता IPO नं पहिल्याच दिवशी केलं मालामाल 
14
Kanhaiya Kumar : कन्हैया कुमार यांच्याकडे संपत्ती किती? शिक्षण किती घेतलंय? जाणून घ्या...
15
Narendra Dabholkar Case: मोठी बातमी! अखेर डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला; अंदुरे, कळसकरला जन्मठेप
16
प्रज्वल रेवण्णा प्रकरणात नवा ट्विस्ट! एसआयटी महिलांना वेश्याव्यवसाय प्रकरणात अडकवण्याची धमकी देते? जेडीएसने दावा केला
17
‘पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, त्यांना सन्मान द्या, तसं न झाल्यास...’ मणिशंकर अय्यर यांचं विधान 
18
‘...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही राहणार नाही’, भाजपाचं मणिशंकर अय्यर यांना प्रत्युत्तर   
19
डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला: "हत्येच्या गुन्ह्याचे समर्थन चुकीचे, तपास अधिकाऱ्यांचा निष्काळपणा" न्यायालयाचे निरीक्षण
20
SSY Vs SIP: सुकन्या समृद्धी की एसआयपी, कोणती स्कीम तुमच्या मुलीसाठी जमवेल अधिक पैसा? जाणून घ्या

अंडी उबवणारे 'इनक्युबेटर' अन् फवारणी करणारे ड्रोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 10:14 PM

ग्रामायण प्रतिष्ठानच्या सेवा प्रदर्शनाच्या निमित्ताने आयईटीईच्या सहकार्याने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी ग्राम उपयोगी तंत्रज्ञान या विषयावर वर्किंग मॉडेल स्पर्धा आयोजित करण्यात आली.

ठळक मुद्दे‘वर्किंग मॉडेल’ स्पर्धा : विद्यार्थ्यांनी सादर केले एकापेक्षा एक सरस मॉडेल

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : अंड्यातून पिले तयार करणारे इनक्युबेटर, शेतीत फवारणीसाठी उपयोगी पडणारे ड्रोन, घर बसल्या शेतातील पाण्याची मोटर तसेच इतर उपकरणे एसएमएसच्या माध्यमातून सुरू करणारे मॉडेल असे शेतीला लागणारे उपयुक्त प्रयोग विविध अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ग्रामायण आणि आयईटीईच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वर्किंग मॉडेल स्पर्धेत सादर केले.

ग्रामायण प्रतिष्ठानच्या सेवा प्रदर्शनाच्या निमित्ताने आयईटीईच्या सहकार्याने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी ग्राम उपयोगी तंत्रज्ञान या विषयावर वर्किंग मॉडेल स्पर्धा आयोजित करण्यात आली. दक्षिण अंबाझरी मार्गावरील प्रोफेसर राजेंद्रसिंह सायन्स एक्स्प्लोरेटरी येथे आयोजित या स्पर्धेत विविध अभियांत्रिकी आणि तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी १७ मॉडेल सादर केले. यात अंड्यातून पिले तयार करणारे इनक्युबेटर, शेतात फवारणी करणारे ड्रोन, एसएमएसच्या माध्यमातून शेतातील उपकरणे सुरु करणारे मॉडेल, चारोळी फोडणारे तंत्रज्ञान, भाजीपाला साठविण्यासाठी कोल्ड स्टोरेज आदी प्रयोग सादर करण्यात आले. यात कमिन्स कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, व्हेटरनरी कॉलेज, झुलेलाल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नालॉजी, नागपूर इन्स्टिट्युट आॅफ टेक्नालॉजी, सेंट विन्सेंट पलोटी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, रामदेवबाबा कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, राजीव गांधी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, एस. बी. जैन कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगमधील विद्यार्थ्यांनी मॉडेल सादर केले. मॉडेलचे परीक्षण नीरीच्या शास्त्रज्ञ डॉ. लीना देशपांडे, बीएसएनएलचे सेवानिवृत्त अधिकारी अजय सावतकर, उद्योजक डॉ. संदीप शिरखेडकर यांनी केले. स्पर्धेत प्रथम क्रमांक शुभम मंधाले, द्वितीय शिवानी श्रीखंडकर, तृतीय स्वप्नील कुर्वे यांना देण्यात आला. तर उत्तेजनार्थ पारितोषिक अंजली पुरी, गौरव पराते आणि सारंग मिश्रा यांना देण्यात आले. डॉ. सुहास बुद्धे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी समन्वयक डॉ. भारतभूषण जोशी, डॉ. राजेंद्र काळे, प्रशांत बुजोणे, सौरभ निमकर, ग्रामायणचे अध्यक्ष अनिल सांबरे उपस्थित होते.

टॅग्स :scienceविज्ञानnagpurनागपूर