शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात रमाई घरकूल योजना प्रभावीपणे राबवा : पालकमंत्र्यांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 21:38 IST

महाराष्ट्र सरकारतर्फे ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जातीच्या लोकांसाठी रमाई घरकूल योजना राबविली जाते. या योजनेचा निधी शिल्लक आहे. असे असूनही निधी खर्च होत नाही. ही गंभीर बाब असून एकप्रकारे गुन्हाच आहे. गरजू लाभार्थींना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी ही योजना प्रभाविपणे राबवा. २ मार्चच्या आत लाभार्थींना अनुदानाचा पहिला हप्ता द्या, तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या वेतनवाढी रोखण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी महापालिकेच्या नेहरूनगर झोनमधील जनसंवाद कार्यक्रमात दिले.

ठळक मुद्देजनसंवाद कार्यक्रमात पाणीटंचाई; नगर रचना व नासुप्रसंदर्भात तक्रारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र सरकारतर्फे ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जातीच्या लोकांसाठी रमाई घरकूल योजना राबविली जाते. या योजनेचा निधी शिल्लक आहे. असे असूनही निधी खर्च होत नाही. ही गंभीर बाब असून एकप्रकारे गुन्हाच आहे. गरजू लाभार्थींना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी ही योजना प्रभाविपणे राबवा. २ मार्चच्या आत लाभार्थींना अनुदानाचा पहिला हप्ता द्या, तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या वेतनवाढी रोखण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी महापालिकेच्या नेहरूनगर झोनमधील जनसंवाद कार्यक्रमात दिले.रमाई आवास योजना राबविताना भेदभाव केला जातो. दहा वर्षांपासून अर्ज करूनही या योजनेचा लाभ मिळत नसल्याबाबत नागरिकांनी व्यथा मांडली. याची दखल घेत पालकमंत्र्यांनी महापालिका प्रशासनाला निर्देश दिले. जनतेच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी महापालिकेच्या नेहरूनगर झोनमध्ये पालकमंत्र्यांचा जनसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. व्यासपीठावर महापौर नंदा जिचकार, आमदार कृष्णा खोपडे, आमदार सुधाकर क ोहळे, परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, दुर्बल घटक समितीचे सभापती हरीश दिकोंडवार, आयुक्त अभिजित बांगर, अपर आयुक्त रवींद्र ठाकरे,नगरसेविका दिव्या धुरडे, रिता मुळे, मनीषा कोठे, मंगला गवरे यांच्यासह पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.झोनच्या कार्यक्षेत्रातील पाणीटंचाई, नवीन गडरलाईन टाकणे, रस्त्यांची दुरुस्ती अतिक्रमण, स्वच्छता अशा स्वरूपांच्या २०७ तक्रारींचा निपटारा करण्यात आला. तक्रारींवर समोरासमोर सुनावणी घेत अधिकाऱ्यांना निर्धारित कालावधीत निपटारा करण्याचे निर्देश दिले. नागरी सुविधांसाठी आवश्यक असलेल्या विकास कामांचा १५ ते २० कोटींचा प्रस्ताव तयार करा, या कामासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करण्याची ग्वाही बावनकुळे यांनी दिली.जनसंवाद कार्यक्रमात वाठोडा भागातील डायमंडनगर, पवनसूतनगर व अन्य वस्त्यात पाणी समस्या असल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणले. अरुण धवड यांनीही पाण्याची समस्या मांडली. स्वाती वऱ्हाडे यांनी एकाच मीटरचे दोन बिल आल्याचे निदर्शनास आणले. सात दिवासात पाणी समस्या सोडविण्याचे निर्देश दिले.शेखर कडवे यांनी दर्शन कॉलनीत अद्याप वीज पोल आलेले नाही. विहिरी अस्वच्छ असल्याने नागरिकांना पाणी वापरता येत नसल्याची तक्रार केली. ईश्वरनगर येथील रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली.शेखर कडवे यांनी महापालिका कर्मचाऱ्यांना १२० कोटींचा अरिअर्स मिळाला नसल्याचे निदर्शनास आणले. यावर बैठक घेण्याचे आश्वासन दिले.भांडेवाडी शेल्टरमधील श्वानांचा त्रासभांडेवाडी येथील शेल्टरमध्ये शहरातील पकडलेले व आजारी श्वान ठेवले जातात. परंतु शेल्टरची जाळी तुटलेली असून येथे ताडपत्री लावण्यात आली आहे. यातून श्वान बाहेर पडतात. यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली.मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतरही डीपीआर नाहीनंदनवन येथील जलकुंभाच्या परिसराचे सौंदर्यीकरण करण्याबाबचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहा महिन्यापूर्वी दिले होते. मात्र महापालिका प्रशासनाकडून अद्यापही डीपीआर तयार करण्यात आला नसल्याचे आ. कृष्णा खोेपडे यांनी निदर्शनास आणले. यावर पालकमंत्र्यांनी तातडीने पीआर तयार करून सौंदर्यीकरण करण्याचे निर्देश दिले.दलालावर कारवाई करानगररचना विभागात दलालांचा सुळसुळाट असून नागरिकांची अडवणूक केली जाते. पैसे घेतल्याशिवाय काम होत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली. भूखंड मोजणी फी अधिक आकारली जात असल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणले. पालकमंत्र्यांनी दलालांचा तात्काळ बंदोबस्त करण्याचे निर्देश नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.कबाडी दुकानांचे अतिक्रमण हटवामानेवाडा ते वाठोडा व हुडकेश्वर चौक परिसरात कबाडी दुकानदारांचे सर्व अतिक्रमण सर्वेक्षण करून हटवा, तसेच या दुकानांचे वीज कनेक्शन खंडित करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. जन्ममृत्यू दाखला घेताना देण्यात येणारे शुल्क कमी करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. दत्तात्रयनगर येथे विहिरीला गडर लाईनचे पाणी येत असल्याच्या तक्रारीवर झोनच्या अधिकाऱ्याने शासकीय खाक्यात उत्तर दिले, त्यावर आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली.मोकळे भूखंड जप्त करामोकळ्या भूखंडांवर लोक कचरा टाकतात, शिळे अन्न फेकण्याच्या तक्रारींवर त्वरित कारवाई करण्याच्या सूचना आयुक्त अभिजित बांगर यांनी दिल्या. त्या भूखंडांवरील कचरा साफ करा व खर्च भूखंडधारकाकडून वसूल करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या असता पालकमंत्र्यांनी हे भूखंड जप्त करून त्याचा लिलाव करण्याचे सुचविले.विहिरींना दुषित पाणीदत्तात्रय नगर येथे विहिरीला गडर लाईनचे पाणी येत असल्याच्या तक्रारीवर झोनच्या अधिकाऱ्यांने शासकीय खाक्यात उत्तर दिले, त्यावर आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. विहिरीतील कचरा काढणे,ही आपलीच जबाबदारी असल्याने यावर निर्देश दिले.

 

टॅग्स :guardian ministerपालक मंत्रीChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे