शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळीचा परिणाम : नागपूर जिल्ह्यात कापसाच्या पेऱ्यात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 21:41 IST

गेल्या वर्षी कापसाच्या पिकावर बोंडअळीचा झालेला परिणाम लक्षात घेता, यंदा कृषी विभागाने केलेल्या नियोजनात कापसाच्या क्षेत्रात घट झाल्याचे निदर्शनास आले आहे. ही घट किमान २ हजार हेक्टरपर्यंत असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. कृषी विभागाने जिल्ह्यासाठी ५ लाख ७ हजार ६०० हेक्टरवर खरीपाचे नियोजन केले आहे.

ठळक मुद्दे५ लाख ७ हजार ६०० हेक्टरवर खरीपाचे नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या वर्षी कापसाच्या पिकावर बोंडअळीचा झालेला परिणाम लक्षात घेता, यंदा कृषी विभागाने केलेल्या नियोजनात कापसाच्या क्षेत्रात घट झाल्याचे निदर्शनास आले आहे. ही घट किमान २ हजार हेक्टरपर्यंत असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. कृषी विभागाने जिल्ह्यासाठी ५ लाख ७ हजार ६०० हेक्टरवर खरीपाचे नियोजन केले आहे.कृषी विभागाचा कापसाच्या लागवडीत घट झाल्याचा अंदाज असला तरी, सर्वाधिक क्षेत्र हे कापूस पिकाने व्यापले आहे. जिल्ह्यात २ लाख २५ हजार हेक्टर कापसाचे लागवडीचे क्षेत्र राहणार असल्याची कृषी विभागाची माहिती आहे. जिल्ह्यात खरीपाचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र ५ लाख ७ हजार ६०० हेक्टरवर आहे. यंदा खरीपासाठी ८६,२०४ क्विंटल बियाणे लागणार आहे. कापसाच्या खालोखाल सोयाबीन लागवडीचे क्षेत्र राहणार आहे. सोयाबीनचा पेरा १ लाख हेक्टरवर होणार आहे. भाताचा पेरा ९४,२०० हेक्टरवर राहणार आहे. तुरीची ६५ हजार हेक्टरवर लागवड करण्यात येणार आहे. संकरित ज्वारीची लागवड यंदाही गेल्या वर्षीप्रमाणे ८ हजार हेक्टर इतकी राहणार आहे. मका ५ हजार हेक्टर, तीळ ३०० हेक्टर, उडीद, मूंग प्रत्येकी १५०० हेक्टर, ऊस ५ हजार हेक्टर, एरंडी ३०० व इतर कडधान्य ३०० हेक्टर राहणार आहे. २६ हजार ५४२ क्विंटल बियाण्यांची मागणीविदर्भात कापसाचा पेरा सर्वाधिक असतो. जिल्ह्यात २ लाख २५ हजार हेक्टर क्षेत्रात कापसाची पेरणी होणार आहे. त्यासाठी बीटी कापसाचे बियाणे ४५०० क्विंटल लागणार आहे. विभागाकडून यंदा महाबीजकडे २६ हजार ५४२ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे, सोबतच कृषी सेवा केंद्रातही मुबलक बियाणे उपलब्ध आहे. कृषी विभागाकडून मार्गदर्शनगेल्या वर्षीप्रमाणे यंदा कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून गावागावात सभेच्या माध्यमातून कृषी सहायक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत, सोबतच बियाण्यांचे सॅम्पलिंग काढणेही सुरू आहे. सध्या शेतकऱ्यांकडून नांगरणीचे काम सुरू आहे. चांगला पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, सोबतच घरचे व कृषी सेवा केंद्रातून खरेदी केलेल्या सोयाबीनच्या बियाण्यांची प्रथम उगवणक्षमता तपासून पाहावी. बियाण्यांची बीज प्रक्रिया करावी. शेतकऱ्यांनी अनधिकृत बियाण्यांची खरेदी करू नये, जेथून बिल उपलब्ध होईल, तेथूनच बियाणे खरेदी करावे, असे आवाहन जिल्हा कृषी कार्यालयाकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :cottonकापूसnagpurनागपूर