शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

गृहमंत्रालयाइतकेच महत्त्व शिक्षण खात्याला हवे : आदित्य ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 19:43 IST

गृहमंत्रालयाइतकेच महत्त्व शिक्षण खात्याला मिळायला हवे, असे प्रतिपादन करत शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनाच चिमटा काढला.

ठळक मुद्देविद्यापीठ, महाविद्यालयांत मिळते ५० वर्षांपुर्वीचे शिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सद्यस्थितीत उद्योगक्षेत्राला यापुढील १० वर्षांचे ज्ञान अपेक्षित आहे, परंतु महाविद्यालयांत मात्र ५० वर्ष जुन्या तंत्रज्ञानाचे धडे दिले जात आहेत. अशा स्थितीत विद्यार्थी रोजगारापासून वंचित राहतात. त्यामुळे देशाच्या व राज्याच्या शिक्षणप्रणालीत आमूलाग्र बदल आवश्यक आहे. सरकारने अभ्यासक्रम बनविताना प्राधान्य ठरवायला हवा. विद्यार्थी हितांवर जास्त भर द्यायला हवा. तसेच गृहमंत्रालयाइतकेच महत्त्व शिक्षण खात्याला मिळायला हवे, असे प्रतिपादन करत शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनाच चिमटा काढला. जनआशीर्वाद यात्रा नागपुरात आली असताना मंगळवारी दुपारी त्यांनी प्रियदर्शिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची ‘आदित्य संवाद’ या कार्यक्रमाअंतर्गत संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमादरम्यान आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. राज्यातील प्रत्येकच विद्यापीठामध्ये काही ना काही त्रुटी आहेत. मी सरकारविरोधात बोलत नाही. परंतु जिथे नेटवर्क नाही तेथे ‘ऑनलाईन’ प्रवेशप्रक्रिया राबविली जाते. सरकारने सारासार विचार करुन प्राधान्य ठरविण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम वेगवेगळा असतो व विविध पातळ्यांवर एकच विषय शिकवल्या जातो. संपूर्ण देशात एकच अभ्यासक्रम लागू झाला पाहिजे, असे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. 
शेतकऱ्यांच्या मुलांना शेती का करायची नाही ?शहरी भागातील लोक निसर्गापासून दूर चाललेत. तर शेतकऱ्यांच्या मुलांना शेती करायची नाही, असे चित्र दिसून येत आहे. शेतीतून बाहेर पडण्याचा नवीन पिढी विचार करत आहे. त्यांना असे पाऊल का उचलावे वाटत आहे, यावर मंथन झाले पाहिजे. शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यायलाच हवा, असे एका विद्यार्थ्याच्या प्रश्नाला उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले. पिकविमा योजनेत मोठा घोटाळा झाला व तो शिवसेनेने बाहेर काढला. आमच्या मुळे १० लाख शेतकऱ्यांना ९६० कोटी रुपयांचा निधी मिळाला. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आम्ही नेहमीच आवाज उठवू, असे त्यांनी सांगितले.प्रत्येकाला ‘मिलिटरी ट्रेनिंग’ नकोमहाविद्यालयीन जीवनात प्रत्येकाला ‘मिलिटरी ट्रेनिंग’ का नाही, असा प्रश्न एका विद्यार्थिनीने विचारला. अशा प्रकारचे प्रशिक्षण आवश्यक आहे. मात्र काही देशविघातक तत्त्व याचा दुरुपयोग करू शकतात. त्यामुळे सरसकट ‘मिलिटरी ट्रेनिंग’ची गरज नाही. विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे निश्चित दिले गेले पाहिजे, असेदेखील आदित्य ठाकरे म्हणाले.आरक्षण आवश्यक पण सर्वांना समान संधी मिळावीआजच्या तरुणांनी जात, पात , धर्म याच्याहून पुढे जात विचार केला पाहिजे. वंचित घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण आवश्यक आहेच. परंतु सर्वानाच समान संधी मिळाली पाहिजे यावरदेखील लक्ष दिले पाहिजे, असे प्रतिपादन आदित्य ठाकरे यांनी केले.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेStudentविद्यार्थी