शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

काठिण्य पातळी तपासण्यासाठी शिक्षण तज्ज्ञांची समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 22:59 IST

इयत्ता ११ वी व १२ वीचा अभ्यासक्रम देशपातळीवर समान असावा, या धोरणानुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ ( एचएससी) तसेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) यांचा अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे. या दोन्ही माध्यमांच्या शाळांमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेसाठी दोन्ही माध्यमांच्या मंडळांमध्ये स्वतंत्रपणे भेदभाव केला जाणार नाही. परंतु दोन्ही माध्यमांच्या अभ्यासक्रमाची काठिण्य पातळी तपासणीच्या दृष्टीने शिक्षणतज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात येईल. दिवाळीच्या आधी ही समिती यासंदर्भात विचार करेल तेव्हा आपला अहवाल सादर करू शकता. अहवालामधील शिफारशीनंतर योग्य पर्यायाची शिक्षणतज्ज्ञांसोबत चर्चा करण्यात येईल, अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली.

ठळक मुद्दे शिक्षणमंत्री विनोद तावडे

 विनोद तावडेनागपूर : इयत्ता ११ वी व १२ वीचा अभ्यासक्रम देशपातळीवर समान असावा, या धोरणानुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ ( एचएससी) तसेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) यांचा अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे. या दोन्ही माध्यमांच्या शाळांमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेसाठी दोन्ही माध्यमांच्या मंडळांमध्ये स्वतंत्रपणे भेदभाव केला जाणार नाही. परंतु दोन्ही माध्यमांच्या अभ्यासक्रमाची काठिण्य पातळी तपासणीच्या दृष्टीने शिक्षणतज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात येईल. दिवाळीच्या आधी ही समिती यासंदर्भात विचार करेल तेव्हा आपला अहवाल सादर करू शकता. अहवालामधील शिफारशीनंतर योग्य पर्यायाची शिक्षणतज्ज्ञांसोबत चर्चा करण्यात येईल, अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली.शिक्षणमंत्री तावडे म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये एचएससी बोर्डाबरोबरच सीबीएसई, आयसीएसई, आयबी या अभ्यासक्रमाचेही मंडळ आहे. या मंडळामध्ये महाराष्ट्राचे विद्यार्थी शिक्षण घेतात. या दोन्ही मंडळाच्या काठिण्य पातळीमध्ये फारशी तफावत नाही. सीबीएसई आदी मंडळाच्या विद्यार्थ्यांना ५०० तर एचएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना ६५० गुण असतात. तरीही दोन्ही मंडळाच्या काठिण्य पातळीची समानता तपासण्याच्यादृष्टीने शिक्षणतज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात येईल. समितीच्या अहवालावर घेण्यात येणारा निर्णय हा गुणवत्तेच्या आधारावर घेण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असेही तावडे यांनी स्पष्ट केले. सुनील प्रभू, अबू आझमी, राज पुरोहित या सदस्यांनी विधानसभेत लक्षवेधीमांडली होती.‘नेबरहूड स्कूलिंग’ संकल्पना शासनाच्या विचाराधीनअकरावीच्या आॅनलाईन प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांना त्यांच्या राहत्या घराजवळ प्रवेश न मिळता तो अतिशय दूर मिळतो, त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होते, तरीही विद्यार्थ्यांना अकरावीचे प्रवेश देताना हे प्रवेश विद्यार्थ्यांच्या घराच्या जवळ मिळावेत, अशी मागणी राज पुरोहित यांनी केली असता, तावडे म्हणाले की, ‘नेबरहूड स्कूलिंग’ ही संकल्पना राज्य शासनाच्या विचाराधीन आहे. त्यादृष्टीने यासंदर्भात अभ्यास करण्याच्यादृष्टीने एक समिती स्थापन करण्यात येईल. शालेय शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव,शालेय शिक्षण, प्रधान सचिव, विधी व न्याय विभागाचे शिक्षण आयुक्त त्याचप्रमाणे सदनाचे सदस्य यांची एक समिती स्थापन करण्यात येईल. यासमितीने दिलेल्या अहवालानंतर यासंदर्भात विचार करण्यात येईल,असेही तावडे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८Vinod Tawdeविनोद तावडे