शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण विभागाचा सर्व्हर डाऊन

By admin | Updated: August 29, 2015 03:25 IST

शिक्षण विभागाने सर्व कामकाज आॅनलाईन करण्याचा घाट घातला आहे. आॅनलाईन कामाचा लोड वाढल्याने शिक्षण विभागाचे सर्व्हर डाऊन होत आहे.

आॅनलाईन कामकाजाला फटका : सरल होणार महिन्याभरात रेग्युलरनागपूर : शिक्षण विभागाने सर्व कामकाज आॅनलाईन करण्याचा घाट घातला आहे. आॅनलाईन कामाचा लोड वाढल्याने शिक्षण विभागाचे सर्व्हर डाऊन होत आहे. संचमान्यता असो की सरलच्या कामाला सर्व्हरमुळे फटका बसत आहे. अतिरिक्त सर्व्हरसाठी ‘एनआयसी’ सोबत बैठक झाली असून, ४० अतिरिक्त सर्व्हर शिक्षण विभागाला मिळणार आहे. त्यामुळे सरलचे काम महिन्याभरात पूर्ण होईल, अशी अपेक्षा राज्याचे शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी व्यक्त केली. शासनाने राबविलेल्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र याचा आढवा घेण्यासाठी शुक्रवारी ते नागपुरात आले असता पत्रकारांशी बोलत होते. राज्यभरातील विद्यार्थ्यांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी, यासाठी सरल ही डाटाबेस यंत्रणा शालेय शिक्षण विभागाने राबविली आहे. यासाठी विद्यार्थ्यांना आधारकार्डची सक्ती केली आहे. आधारकार्डसाठी विद्यार्थ्यांची लूट सुरू असल्यामुळे आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांची माहिती गोळा करून, शाळेतच आधारकेंद्र सुरू करण्याचा प्रयत्न आहे. सरलचे काम विभागनिहाय वाटून देण्यात आले आहे. नागपूर विभागात ६ ते ९ सप्टेंबर दरम्यान सरलची नोंदणी करायची आहे. अद्याप राज्यभरात सरलमध्ये ३० टक्के विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. दरवर्षी आरटीई संदर्भात होत असलेला घोळ पुढच्या वर्षापासून होणार नाही, यासाठी सर्वसमावेशक धोरण राबविण्यात येणार आहे. शिक्षण विभागात अधिकाऱ्यांची कमतरता आहे. १७२ वर्ग २ च्या अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. केंद्र प्रमुख व विस्तार अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहे. ही लवकरात लवकर भरण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला शिक्षण उपसंचालक अनिल पारधी, विभागीय उपायुक्त कमलकिशोर फुटाणे उपस्थित होते. (प्रतिनिधी)