शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण विभाग संभ्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 20:16 IST

जिल्ह्यात १ जुलैपासून शाळा सुरू करण्यासाठी काही शाळांनी नियोजन केले होते. शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार उपायोजनाही केल्या होत्या. पण शाळा सुरू करावी याबाबत वरिष्ठांकडून कुठलेही स्पष्ट निर्देश नसल्याने १ जुलैला शाळा सुरूच झाल्या नाहीत.

ठळक मुद्देशाळांनी केले होते नियोजन; प्रशासनाकडून स्पष्ट निर्देश नाहीत : जिल्ह्यात शाळा सुरूच झाल्या नाहीत

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : जिल्ह्यात १ जुलैपासून शाळा सुरू करण्यासाठी काही शाळांनी नियोजन केले होते. शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार उपायोजनाही केल्या होत्या. पण शाळा सुरू करावी याबाबत वरिष्ठांकडून कुठलेही स्पष्ट निर्देश नसल्याने १ जुलैला शाळा सुरूच झाल्या नाहीत. शाळा स्थानिक शिक्षण विभागाकडून स्पष्ट निर्देश येईल या प्रतीक्षेत आहेत. तर शिक्षण विभाग वरिष्ठांकडून स्पष्ट निर्देश येईल या प्रतीक्षेत आहे.राज्य शासनाने ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊनची कालमर्यादा वाढविण्याबरोबरच निर्बंध कमी करम्यासाठी ‘मिशन बिगिन अगेन’ बाबतची अंंमलबजावणी करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. यानुसार शाळा, महाविद्यालये, शिकवणी वर्गाबाबतचे प्रतिबंध ३१ जुलैपर्यंत कायम आहे. पण जून महिन्यात शालेय शिक्षण विभागाने १५ जून रोजी काढलेल्या परिपत्रकात नववा, दहावा, अकरावा व बारावा वर्ग जुलै महिन्यापासून सुरू करण्यासंदर्भात काही मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. त्यात शाळा व्यवस्थापन समितीच्या शिफारशीनुसार शाळा सुरू करण्याचे सुचित केले होते. त्याचबरोबर स्वच्छतेच्या बाबतीतही दिलेल्या निर्देशाचे पालन करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शाळांनी नियोजनही केले होते. २४ जून रोजी पुन्हा शासन परिपत्रक प्रसिद्ध झाले. त्यात शिक्षकांच्या उपस्थितीबाबत स्पष्ट निर्देश दिले होते. त्यानुसार १ जुलै रोजी जिल्ह्यातील काही शाळांनी शाळा सुरू करण्याचा प्रयत्न केला. परंतु स्थानिक प्रशासनाने वरून कुठल्याही सूचना नसल्याने शाळांना सहकार्य केले नाही.माध्यमिक शिक्षण विभागाने घेतलेल्या आढाव्यानुसार जिल्ह्यात एकही शाळा सुरू झाली नसल्याचे स्पष्ट केले.अधिकारी निर्णय घ्यायला असमर्थशालेय शिक्षण विभागाने काढलेल्या दोन्ही परिपत्रकात शाळा सुरू करण्यासंदर्भात स्पष्ट निर्देश दिलेले नाहीत. त्यामुळे क्षेत्रीय अधिकाऱ्यांनीसुद्धा त्याच परिपत्रकानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे पंचायत समिती स्तरावरील अधिकारीसुद्धा निर्णय घेण्यास असमर्थ ठरले.शिक्षण उपसंचालकांनी दिले होते स्पष्ट निर्देशशिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांनी १५ जून रोजी पत्र काढून शाळा सुरू करण्याबाबत शासनाचे कुठलेही आदेश नसल्यामुळे शाळा सुरू करू नयेत, अशा स्पष्ट सूचना केल्या होत्या. असे असले तरी, स्थानिक प्रशासनाकडून मुख्याध्यापकांच्या बैठका, शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठका घेण्यात आल्या.संस्थाचालकांचे मुख्यमंत्र्यांना पत्रमहाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी स्पष्ट केले की, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शाळांना प्रत्यक्ष सुरुवात करणे धोक्याचे आहे. सध्याची परिस्थिती बघता शिक्षण संस्था व शाळा प्रशासन जबाबदारी पेलण्यास असमर्थ आहे.

टॅग्स :SchoolशाळाEducationशिक्षण