शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

शिक्षणाचे सौंदर्य हे शिक्षकांतच

By admin | Updated: September 6, 2014 03:05 IST

शिक्षणाचे खरे सौंदर्य हे शिक्षकांमध्येच दडले आहे. जुन्या दिवसांपेक्षा शिक्षकांना आता ‘अच्छे दिन’ आले आहेत, परंतु त्यांना जेवढा पगार मिळतो तितके ...

नागपूर : शिक्षणाचे खरे सौंदर्य हे शिक्षकांमध्येच दडले आहे. जुन्या दिवसांपेक्षा शिक्षकांना आता ‘अच्छे दिन’ आले आहेत, परंतु त्यांना जेवढा पगार मिळतो तितके खरेच कार्य करतो का याचा विचार शिक्षकांनी करण्याची गरज आहे. शिक्षणक्षेत्राची दुरवस्था टाळणे हे शिक्षकांच्याच हातात असल्याचे मत डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे शुक्रवारी दीक्षांत सभागृहात शिक्षकदिनानिमित्त उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.शिक्षक कल्याण निधीअंतर्गत उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारासाठी विद्यापीठाच्या सात शिक्षकांची निवड करण्यात आली होती. विद्यापीठाच्या इतिहास विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. शुभा जोहरी, सांख्यिकीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. माणिक खापर्डे, धनवटे नॅशनल कॉलेजचे डॉ. रत्नाकर भेलकर, एम.पी.देव स्मृती धरमपेठ विज्ञान महाविद्यालयाचे डॉ.एन.एल.खोब्रागडे यांचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने सन्मान करण्यात आला. उत्कृष्ट संशोधक पुरस्कार विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. अरुण जाधव यांना देण्यात आला. सामाजिक कार्यात भरीव काम करणाऱ्या शिक्षकांना देण्यात येणाऱ्या सामाजिक कार्य उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने शासकीय वसंतराव नाईक संस्थेचे डॉ. भाऊ दायदार यांना सन्मानित करण्यात आले. भंडारा येथील आर. एम. पटेल महाविद्यालयाच्या डॉ. जुल्फी शेख यांना उत्कृष्ट लेखक पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर, अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले, प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, कुलसचिव डॉ. अशोक गोमाशे, डॉ. पुरण मेश्राम व आयोजन समितीच्या अध्यक्ष डॉ. अर्चना नेरकर प्रामुख्याने उपस्थित होते.शिक्षणक्षेत्रात गेल्या काही काळापासून आमूलाग्र बदल झाले आहेत. विद्यापीठांमध्ये संशोधनाला जास्तीत जास्त महत्त्व देण्याची आवश्यकता आहे. संशोधन प्रक्रियेला विद्यापीठाने चालना दिली पाहिजे व विद्यार्थ्यांना त्याकडे जाण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. सोबतच समाजात शिक्षकांचे स्थान आदराचे कसे राहील यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करायला हवेत, असे मत डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी व्यक्त केले.प्रास्ताविक डॉ. नेरकर यांनी केले. संचालन डॉ. कोमल ठाकरे तर आभार डॉ. मेश्राम यांनी मानले. (प्रतिनिधी)