शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

मेडिकलच्या रोबोटिक शल्यक्रियेला ग्रहण : २५ कोटीं हाफकिनकडे पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 23:14 IST

काल-परवापर्यंत स्वप्नवत वाटणारी रोबोटिक शल्यक्रिया आता नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातही (मेडिकल) होणार होती. जिल्हा नियोजन समितीने मेडिकलच्या रोबोटिक शस्त्रक्रिया विभागाला यासाठी २५ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. परंतु शासनाने औषधांच्या खरेदीपासून ते यंत्रसामुग्री खरेदीचे अधिकार हाफकिन कंपनीला दिल्याने हा निधी या कंपनीकडे वळता करण्यात आला. याला आता आठ महिन्यावर कालावधी लोटला. परंतु यंत्र खरेदीला सुरुवातच झाली नसल्याने मेडिकलच्या रोबोटिक शल्यक्रियेला ग्रहण लागल्याचे बोलले जात आहे.

ठळक मुद्देहोणार होते पहिले रोबोटिक शस्त्रक्रिया विभाग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काल-परवापर्यंत स्वप्नवत वाटणारी रोबोटिक शल्यक्रिया आता नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातही (मेडिकल) होणार होती. जिल्हा नियोजन समितीने मेडिकलच्या रोबोटिक शस्त्रक्रिया विभागाला यासाठी २५ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. परंतु शासनाने औषधांच्या खरेदीपासून ते यंत्रसामुग्री खरेदीचे अधिकार हाफकिन कंपनीला दिल्याने हा निधी या कंपनीकडे वळता करण्यात आला. याला आता आठ महिन्यावर कालावधी लोटला. परंतु यंत्र खरेदीला सुरुवातच झाली नसल्याने मेडिकलच्या रोबोटिक शल्यक्रियेला ग्रहण लागल्याचे बोलले जात आहे.रोबोटिक तंत्रामुळे शस्त्रक्रियेत रुग्णाच्या स्नायूंची जास्त चिरफाड करावी लागत नाही. मानवाच्या तुलनेत यांत्रिक रोबोट हा शरीरात ३६० डिग्रीपर्यंत फिरतो. त्यामुळे गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीतेचे प्रमाण वाढते. यांत्रिकी पद्धतीने टाके लावण्याची प्रक्रिया सोपी होते. त्यामुळे शरीरातील रक्त कमी प्रमाणात वाया जाते आणि वेदनाही कमी होतात. रुग्ण लवकरात लवकर बरा होऊन घरीही परततो. मेडिकलच्या बहुतांश लेप्रोस्कोपी पद्धतीच्या शस्त्रक्रिया यांत्रिकी पद्धतीने झाल्यास शस्त्रक्रियांची संख्याही वाढणार होती. मेडिकलच्या शल्यचिकित्सा विभागाने यासाठी पुढाकर घेतला. यांत्रिक रोबोट घेण्याचा प्रस्ताव तयार केला. जिल्हा नियोजन समितीने २५ कोटींच्या निधीला मंजुरी दिली.भारतात सध्या सुमारे १०० शस्त्रक्रिया करणारे यांत्रिक रोबोट आहेत. यातील बहुतांश पुणे, मुंबई, हैदराबाद, चेन्नई व दिल्लीच्या खासगी रुग्णालयांत आहे. शासकीय संस्थेपैकी केवळ ‘एम्स’मध्ये हा रोबोट उपलब्ध आहे. नागपूरच्या मेडिकलमध्ये हे यंत्र उपलब्ध झाल्यास याचा फायदा सर्वसामान्य रुग्णांना होणार होता. परंतु वैद्यकीय शिक्षण विभागाकडून यंत्रसामुग्रीचे खरेदीचे अधिकार काढून त्याचे केंद्रीकरण केल्याने घोळ झाला. हाफकिन कंपनीकडे हा निधी वळता करण्यात आला. मात्र निधी असूनही यंत्राची खरेदी होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. संथगतीच्या या कार्यप्रणालीमुळे सामान्यांना फटका बसत आहे, तर मेडिकलच्या विकासात मोठा अडथळा निर्माण झाल्याचे चित्र आहे.

 

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयRobotरोबोट