शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

पूर्व विदर्भात तीन वर्षात ५,१६२ मृत बालकांचा जन्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 11:10 IST

पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांत २०१७ मध्ये जन्माआधीच गर्भाशयात बाळाच्या मृत्यूंची (स्टिलबर्थ) १,९०९ प्रकरणे समोर आली होती. याची टक्केवारी १५.९ होती. २०१८ मध्ये प्रकरणे कमी होऊन १,६४४ वर म्हणजे १४.३ टक्क्यांवर आली.

ठळक मुद्देकेवळ चार टक्क्यानेच प्रमाण कमीउच्च रक्तदाब, अतिरक्तस्राव व मधुमेह ठरतेय कारण

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांत २०१७ मध्ये जन्माआधीच गर्भाशयात बाळाच्या मृत्यूंची (स्टिलबर्थ) १,९०९ प्रकरणे समोर आली होती. याची टक्केवारी १५.९ होती. २०१८ मध्ये प्रकरणे कमी होऊन १,६४४ वर म्हणजे १४.३ टक्क्यांवर आली. २०१९ मध्ये हे प्रकरण आणखी कमी व्हायला हवे होते परंतु १६०९ वर स्थिरावले. एकूणच तीन वर्षात स्टिलबर्थचे प्रमाण केवळ चार टक्क्यानेच कमी झाले आहे. गेल्या तीन वर्षांत एकूण ५,१६२ मृत बालकांचा जन्म झाला आहे.गेल्या काही वर्षांत वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे गर्भाशयातच बाळाच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र अयोग्य जीवनशैलीने हे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी झालेले नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. बैठे काम, जंक फूडचे अतिसेवन, व्यायामाचा अभाव आदी कारणांमुळे लठ्ठपणा वाढून मधुमेह, हृदयरोगाचा आजार वाढले आहेत. शिवाय, गर्भवतीचे विविध आजार, गर्भारपणात उच्च रक्तदाब, अपस्माराचा झटका, रक्त गोठण्याच्या प्रक्रियेतील अडथळे आदीमुळे ‘स्टिलबर्थ’चा धोका वाढला आहे.एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात १४३८ स्टिलबर्थची प्रकरणेपूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा व नागपूर या सहा जिल्ह्यांची तुलना केल्यास २०१७ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात ४२८, २०१८ मध्ये ४५७ तर २०१९ मध्ये ५५३ अशी एकूण १४३८ प्रकरणे समोर आली. तर गडचिरोली जिल्ह्यात २०१७ मध्ये ५५७, २०१८ मध्ये ३८६ व २०१९ मध्ये ३६२ म्हणजे १३०५ स्टिलबर्थची नोंदणी झाली. या दोन जिल्ह्यांत ‘स्टिलबर्थ’ प्रकरणांची संख्या मोठी असतानाही आवश्यक त्या सोयी उपलब्ध नाहीत.गर्भवतींनी धोक्याची चिन्हे ओळखायला हवीहृदयरोग, उच्च रक्तदाब, नियंत्रित नसलेला मधुमेह, अति रक्तस्त्राव, कमी दिवसांची गर्भधारणा, वेगवेगळे जंतूसंसर्ग व गर्भवतीचे वय ४० पेक्षा जास्त ही धोक्याची चिन्हे आहेत. यामुळे ‘स्टिलबर्थ’ची शक्यता वाढते. यामुळे प्रत्येक गर्भवतीने डॉक्टरांकडून वेळोवेळी तपासणी करून घ्यावी.-डॉ. चैतन्य शेेंबेकर,स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ

टॅग्स :Healthआरोग्य