शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बँकेत सुलभपणे बदलवा २ हजाराच्या नोटा; रांगा नाहीत

By मोरेश्वर मानापुरे | Updated: May 23, 2023 14:32 IST

ग्राहकाला भरावी लागते एका फॉर्ममध्ये माहिती : सर्वच बाजारपेठांमध्ये २ हजारांच्या नोटेने होताहेत व्यवहार

नागपूर : रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी एक पत्रक जारी करीत दोन हजार रुपयांची नोट चलनातून मागे घेत असल्याचे म्हटले होते, पण त्याचवेळी ही नोट चलनात कायम राहील, असेही रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले होते. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम पसरला होता. तो सोमवारी नोटा बदलविता दूर झाला. त्यामुळे सर्वच बँकांमध्ये ग्राहकांच्या रांगा दिसल्या नाहीत. 

सदर प्रतिनिधीने दुपारी नंदनवन येथील कॅनरा बँक, गुरुदेवनगर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया, ओमनगर येथील बँक ऑफ बडोदा, सीताबर्डी येथील बँक ऑफ महाराष्ट्र आणि बँक ऑफ इंडियाची पाहणी केली. या सर्व बँकांमध्ये नोट बदलविणाऱ्या ग्राहकांची छोटी वा मोठी रांगा दिसली नाही. ग्राहक फॉर्म भरून २ हजारांच्या नोटा बदलून घेताना दिसले. याकरिता कुणालाही रांगेत जास्त वेळ उभे राहावे लागत नसल्याचे कॅनरा बँकेच्या व्यवस्थापनाने सांगितले. हीच बाब स्टेट बँकेच्या व्यवस्थापनाने स्पष्ट केली.

ते म्हणाले, फॉर्मवर नोटा बदलविणाऱ्या ग्राहकाचे नाव, मोबाईल क्रमांक, बँकेत असलेल्या खात्याचा क्रमांक भरून द्यायचा आहे. फॉर्म भरून दिल्यास तातडीने नोटा बदलवून दिल्या जात आहेत. याशिवाय एका बँकेच्या ग्राहकाला दुसऱ्या बँकेत नोटा बदलविता येऊ शकते. ग्राहकांना असे कोणतेही बंधन नाही. त्यामुळे बँकेत मोठी रांग वा गर्दी होण्याचा प्रश्नच नाही. शिवाय २ हजाराच्या कितीही नोटा जमा करता येऊ शकतात. सीताबर्डी येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत सकाळी जवळपास १५ ग्राहक रांगेत होते. त्यांना नोटा बदलवून घेण्यासाठी फार वेळ थांबावे लागले नाही. केवळ फॉर्मच्या आधारे त्यांना २ हजाराच्या नोटा बदलवून दिल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. 

सर्व बाजारपेठांमध्ये २ हजारांचे चलन सुरू

शुक्रवारी रिझर्व्ह बँकेच्या घोषणेनंतर २ हजाराच्या नोटेसंदर्भात लोकांमध्ये तीन दिवस पॅनिक होते. बाजारपेठांमध्ये नोटा चालणार वा नाही, यावर संभ्रम होता. पण आता पेट्रोल पंपासह सर्वच बाजारपेठांमध्ये या नोटांनी व्यवहार सुरळीत झाल्यानंतर पॅनिक दूर झाले. सर्वच बाजारपेठांमधील व्यापारी २ हजाराच्या नोटा स्वीकारत आहेत. या नोटा लोकांकडे फार कमी प्रमाणात असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे. सराफा बाजारात २ हजारांच्या नोटा स्वीकारल्या जात नाहीत, असे व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले.

ग्राहक काय म्हणतात...

कॅनरा बँकेत २ हजाराच्या नोटा बदलविण्यासाठी आलेले ग्राहक दिलीप वडे म्हणाले, मी निवृत्त शासकीय कर्मचारी आहे. माझे कॅनरा बँकेत खाते नाही. पण नोटा बदलविण्यासाठी या बँकेत आलो आहे. वैयक्तिक माहितीचा फॉर्म भरून दिल्यानंतर कॅशियरने २ हजाराच्या १० नोटा बदलवून दिल्या.

टॅग्स :bankबँकnagpurनागपूर