शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षात देशात १३८ ठिकाणी भूकंप लहरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 23:43 IST

२०१५ पासून डिसेंबर २०१९ या काळात देशभरात विविध १३८ ठिकाणी भूकंपाचे धक्के नागरिकांनी अनुभवले आहेत. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या अहवालात ही माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देनेपाळ वगळता कुठेही जीवित व वित्तहानी नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २०१५ पासून डिसेंबर २०१९ या काळात देशभरात विविध १३८ ठिकाणी भूकंपाचे धक्के नागरिकांनी अनुभवले आहेत. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. सुदैवाने यातील कोणत्याच ठिकाणी जीवितहानी किंवा वित्त हानी झाली नाही.भूकंपासारखी नैसर्गिक आपत्ती भयावह चित्र निर्माण करणारी असते. भूगर्भातील हालचाली तशा नियमित घडणाऱ्या आहेत मात्र एखाद्या वेळी तीव्र स्वरूप धारण केले तर त्याचे भयकारी परिणाम मानव आणि सजीवांना सोसावे लागतात. १९९३ साली महाराष्ट्राच्या किल्लारी येथे आणि २००१ मध्ये गुजरातच्या भुज परिसरातील कटू आठवणी अजूनही ताज्या आहेत. किल्लारीत १०,००० तर भुजमध्ये २२००० नागरिकांचे बळी गेले तर लाखो लोक बेघर झाले. प्राण्यांचे मृत्यू तसेच आर्थिक व नैसर्गिक हानी झाली ती वेगळी. सुदैवाने त्यानंतर कुठलाही भूकंप हानिकारक ठरला नाही. मात्र २००४ साली सुमात्रा बेटावर आलेल्या भूकंपामुळे हिंदी महासागरात सुनामी निर्माण झाली आणि त्याचे मोठे परिणाम तटावरील नागरिकांनी भोगावे लागले. २०१५ मध्ये नेपाळमध्ये आलेल्या भूकंपामुळे या देशात जीवित आणि वित्त हानी झाली.आपल्या देशात हिमालय आणि पूर्वोत्तर राज्ये हे भूकंपाचे संवेदनशील पट्टे म्हणून ओळखले जातात. याशिवाय गुजरातचे कच्छ आणि भुज या प्रदेशाचा कमी संवेदनशील भागात समावेश होतो. जीएसआयच्या अहवालानुसार २०१५ पासून पाच वर्षात १३८ मोठ्या भूकंपाच्या नोंदी झाल्या. याशिवाय ४ पेक्षा कमी तीव्रता असलेल्या भूकंप लहरींही घडल्या पण तीव्रता परिणामकारक नव्हती. यातील बहुतेक हिमालय आणि पूर्वोत्तर राज्यातील आहेत. १३८ पैकी काहींची तीव्रता रिश्टर स्केलमध्ये ६ ते ७ च्या जवळपास होती. ही तीव्रता तशी धोकादायक मानली जाते. पूर्वोत्तर राज्यात भूकंपाबाबत जागृती असल्याने त्याचे परिणाम जाणवले नसल्याचे भूवैज्ञानिकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :EarthquakeभूकंपIndiaभारत