लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विद्यार्थ्यांच्या कल्पनांना खरेतर मर्यादा नाहीत. या कल्पनांना मग गणिताच्या सूत्रांची, जीव-भौतिक-रसायन आणि खगोलशास्त्राच्या संकल्पनांची अभ्यासपूर्ण जोड मिळाली की त्यांची भरारी आकाशापलिकडे गवसणी घालते आणि त्यातून निर्माण होते नवे विज्ञान. विद्यार्थ्यांच्या अशाच अभ्यासपूर्ण कल्पनांमधून साकारलेले नवनवे प्रयोग सध्या रमण विज्ञान केंद्रात अनुभवायला मिळत आहेत. सायकलचा उपयोग करून इकोफ्रेंडली वॉशिंग मशीन, सौर ऊर्जेतून सिंचनाचे तंत्र, भूकंपाची पूर्वसूचना देणारे तंत्र, भूकंप आल्यानंतरही इमारत सुरक्षित राहील असे तंत्र, घरगुती व्हॅक्यूम क्लीनर, घरगुती स्वच्छता मशीन असे अनेक प्रयोग लक्ष वेधून घेतात. विशेष म्हणजे हे सर्व तंत्रज्ञान प्रत्यक्ष दैनंदिन जीवनात आपण उपयोगात आणू शकतो, असा विश्वासही हे विद्यार्थी देतात.
भूकंप सुरक्षित इमारती, घरगुती व्हॅक्यूम क्लीनर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 01:03 IST
सायकलचा उपयोग करून इकोफ्रेंडली वॉशिंग मशीन, सौर ऊर्जेतून सिंचनाचे तंत्र, भूकंपाची पूर्वसूचना देणारे तंत्र, भूकंप आल्यानंतरही इमारत सुरक्षित राहील असे तंत्र, घरगुती व्हॅक्यूम क्लीनर, घरगुती स्वच्छता मशीन असे अनेक प्रयोग लक्ष वेधून घेतात.
भूकंप सुरक्षित इमारती, घरगुती व्हॅक्यूम क्लीनर
ठळक मुद्देविद्यार्थ्यांनी घडविले वैज्ञानिक कौशल्याचे दर्शन : रमण विज्ञान केंद्रात भरला विज्ञान मेळावा