शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील जरीपटका, सदरमध्ये ई-तिकिटांच्या रॅकेटचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 00:06 IST

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने गुरुवारी बैरामजी टाऊन, सदर आणि जरीपटका परिसरात ई-तिकिटांच्या रॅकेटचा पर्दाफाश करून दोन आरोपींना ३० ई-तिकिटांसह ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देआरपीएफची कारवाई : ३० ई-तिकिटा जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्यारेल्वे सुरक्षा दलाने गुरुवारी बैरामजी टाऊन, सदर आणि जरीपटका परिसरात ई-तिकिटांच्या रॅकेटचा पर्दाफाश करून दोन आरोपींना ३० ई-तिकिटांसह ताब्यात घेतले आहे.दपूम रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाचे विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गणेश गरकल यांच्या नेतृत्वात गुन्हे शाखेने ही कारवाई केली. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे रेल्वे सुरक्षा दलाने बैरामजी टाऊन सदरच्या सागर ट्रेडर्सवर धाड टाकली. दरम्यान संचालक सागर मोहन हिंगोरानी अवैधरीत्या ई-तिकीट बनविताना आढळला. दुसरी कारवाई जनता चौक जरीपटका येथील कुलदीप इलेक्ट्रॉनिक्स अँड पारस ट्रेडर्सवर करण्यात आली. येथे ताराचंद नानवानी संगणकावर ई-तिकीट अवैधरीत्या काढताना आढळला. आरोपी सागर हिंगोरानी याच्याजवळून अवैधरीत्या काढलेल्या ५०,४८१ रुपये किमतीच्या १९ ई-तिकिटा, १ कॉम्प्युटर जप्त करण्यात आला. आरोपी ताराचंद नानवानी याच्याजवळून १८,६०० रुपयांच ई-तिकिट जप्त केल्या. याशिवाय १ मॉनिटर, १ सीपीयू, १ डोंगल, रोख १५५०, १ मोबाईल, सीमकार्ड, १ डायरी जप्त करण्यात आली. दोन्ही आरोपींना अटक करून मोतीबाग आरपीएफ ठाण्यात आणण्यात आले. दोघांविरुद्ध रेल्वे अ‍ॅक्ट १४३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत १ लाख ११ हजार १३० रुपये आहे. जरीपटका आणि सदर पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई उपनिरीक्षक उषा बिसेन, सहायक उपनिरीक्षक सुजाता थोरात, हेड कॉन्स्टेबल सतीश इंगळे, अरविंद टेंभुर्णीकर, राहुल सिंग, सागर सालोडकर, प्रदीप गाढवे यांनी पार पाडली.

टॅग्स :railwayरेल्वेticketतिकिट