शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पीएम मित्रा टेक्स्टाइल पार्कची ई-पायाभरणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 10:56 IST

Amravati : नांदगाव पेठ एमआयडीसी; लोकप्रतिनिधी, उद्योजकांसह मान्यवरांची मांदियाळी

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : नजीकच्या नांदगाव पेठ येथील पंचतारांकित एमआयडीसीत पीएम मित्रा टेक्स्टाइल पार्कची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी थाटात ऑनलाइन पायाभरणी करण्यात आली. वर्धा येथे आयोजित कार्यक्रमातून पंतप्रधानांनी रिमोटद्वारे पायाभरणी करताना पीएम मित्रा टेक्स्टाइल पार्कमुळे देशाच्या अर्थकारणाला हातभार लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नांदगाव पेठ येथील अतिरिक्त अमरावती औद्योगिक क्षेत्र येथे वर्धा येथील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, माजी खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, भाजपा सरचिटणीस नितीन गुडधे, डिगर गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रज्ञा बाजारे, पिंपर विहीरच्या सरपंच मुक्ता ठाकरे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता ए. बी. डाबेराव, सहायक पोलिस आयुक्त सागर पाटील, के. एम. पुंडकर, प्रादेशिक अधिकारी प्रशांत पडाळकर, वस्त्रोद्योग उप वस्त्रोद्योग अभियंता सुधीर अमृतकर, तहसीलदार वैशाली पाथरे, उप अभियंता संजय विधळे, उप अभियंता राठोड, क्षेत्र व्यवस्थापक सुभाष राऊत आदी उपस्थित होते. दरम्यान, राज्यातील आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे ऑनलाइन उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते वर्धा येथून करण्यात आले. यात जिल्ह्यातील १३ केंद्राचे उ‌द्घाटन करण्यात आले आहे.

शिवाजी विज्ञान महाविद्यालयातील सी. व्ही. रमण सभागृहात कार्यक्रम पार पडला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष जयवंत पुसदेकर, सदस्य सुभाष बनसोड, प्राचार्य डॉ. जी. व्ही. कोरपे, डॉ. दिनेश खेडकर, कौशल्य विकासच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर आदी उपस्थित होते. 

औद्योगिक वसाहतीचा चेहरामोहरा बदलला मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेक्स्टाइल पार्कमुळे औद्योगिक वसाहतीचा चेहरामोहरा बदलला आहे. याठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येण्यास मदत झाली आहे. याठिकाणी तीन लाख रोजगार निर्माण होणार असल्याने या भागाची प्रतिमा उंचावण्यास मदत होणार आहे. देशातील सात टेक्स्टाइल पार्कपैकी एक विदर्भात मंजूर झाल्याबद्दल प्रधानमंत्र्यांचे आभार मानले.

स्थानिकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार ना. फडणवीस नांदगाव पेठ येथील टेक्स्टाइल पार्कमुळे स्थानिकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. त्यामुळे येथील अर्थकारणास वेग येणार आहे. याठिकाणी नवीन गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. हा प्रकल्प देशाचा जीडीपी वाढविण्यासाठी राज्याच्या वाटा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टेक्स्टाइल पार्क मंजूर होणे, ही महत्त्वपूर्ण बाब आहे. त्यामुळे विकासाच्या वाटा निर्माण होतील, असेही फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीwardha-acवर्धाamravati-acअमरावती