शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात डायनॅमिक शातभी बसूंनी सांगितले ड्रिंक्स मिक्सिंगचे तंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 22:57 IST

पुरुषांचाही सहभाग कमी होता अशा काळामध्ये बार टेंडरचा पेशा स्वीकारणाऱ्या डायनॅमिक मिक्सोलॉजिस्ट शातभी बसू यांनी सोमवारी वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलमध्ये ड्रिंक्स मिक्सिंगच्या तंत्राची माहिती दिली.

ठळक मुद्देख्यातनाम मिक्सोलॉजिस्ट : कॉकटेल व मॉकटेलमध्ये संत्र्याचा उपयोग

आॅनलाईन लोकमतनागपूर : पुरुषांचाही सहभाग कमी होता अशा काळामध्ये बार टेंडरचा पेशा स्वीकारणाऱ्या डायनॅमिक मिक्सोलॉजिस्ट शातभी बसू यांनी सोमवारी वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलमध्ये ड्रिंक्स मिक्सिंगच्या तंत्राची माहिती दिली. सिव्हिल लाईन्स येथील पॅबलो रेस्टॉरन्टमध्ये त्यांचा कार्यक्रम झाला. अल्कोहोलिक व नॉन-अल्कोहोलिक ड्रिंक्समध्ये रुची ठेवणारे व्यक्ती, हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमातील विद्यार्थी व बार टेंडर म्हणून कार्यरत असणारे तरुण यांनी बसू यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.बसू मुंबई येथे सुमारे ४० वर्षांपासून बार टेंडर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या कौशल्याने देशभरात नाव कमावले आहे. या क्षेत्रात करियर करण्याचे स्वप्न बाळगणाऱ्यांसाठी त्या आदर्श आहेत. त्यांनी कार्यक्रमात बोलताना वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलची प्रशंसा केली. तसेच कॉकटेल्स व मॉकटेल्समध्ये संत्री, संत्रा जाम, संत्रा ज्यूस इत्यादीचा कसा प्रभावीपणे उपयोग केला जाऊ शकतो याची माहिती दिली व त्यासंदर्भात प्रात्यक्षिकही करून दाखवले. त्यांनी तयार केलेले मिक्स्ड ड्रिंक्स प्रेक्षकांना वितरित करण्यात येत होते. प्रेक्षकांनी त्यांच्या प्रत्येक मिक्स्ड ड्रिंकला मनापासून दाद दिली. बसू यांनी ग्लास रिम तयार करण्यासंदर्भातही माहिती दिली.मिक्स्ड ड्रिंक्स तयार करण्याचे तंत्र सांगताना त्यांनी अन्य विविध मुद्यांवर मार्गदर्शन केले. या क्षेत्रात करियर करणाऱ्यांना स्वत:ला बार टेंडर म्हणवून घेणे आवडत नाही. ते स्वत:ला मिक्सोलॉजिस्ट संबोधतात. परंतु त्यांनी बार टेंडर हा सुद्धा चांगला शब्द असल्याचे लक्षात घ्यावे. उत्तम बार टेंडर झाल्याशिवाय कुणीही उत्तम मिक्सोलॉजिस्ट होऊ शकत नाही, असे बसू यांनी सांगितले.बार टेंडरने नेहमी चेहऱ्यावर हास्य ठेवायला हवे. ग्राहकांचा सन्मान करायला हवा. ग्राहकांचे समाधान कसे होईल, हाच विचार बार टेंडरने करायला पाहिजे, तसेच आपल्याला रोज नवीन काय करता येईल, यासंदर्भात संशोधन करणे आवश्यक आहे. ड्रिंक्सबाबत नागरिकांमध्ये अनेक गैरसमज आढळून येतात. त्यांचे गैरसमज दूर करण्याची व त्यांना योग्य माहिती देण्याची जबाबदारी बार टेंडरची आहे, याकडे बसू यांनी लक्ष वेधले.बसू यांनी स्वदेशी ड्रिंक्सचे जोरदार समर्थन केले. आपल्याकडे चांगले मिक्स्ड ड्रिंक्स तयार करण्यासाठी अनेक वस्तू उपलब्ध आहेत. त्यामुळे विदेशी वस्तूंचा उपयोग करण्याची गरज नाही. उलट विदेशी लोकांना शिकविण्यासाठी व सांगण्यासाठी आपल्याकडेच ज्ञानाचे मोठे भांडार आहे, असे बसू यांनी सांगितले.

 

टॅग्स :world orange festival Nagpurवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरnagpurनागपूर