शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

झाडाच्या फांदीत अडकून बिबट्याचा मृत्यू

By admin | Updated: May 12, 2014 00:33 IST

माकडाची शिकार करताना माकडांप्रमाणेच झाडावरून जमिनीवर तर जमिनीवरून झाडावर उड्या मारताना झाडाच्या दोन फांद्यांमध्ये अडकून बिबट्याचा अपघाती मृत्यू झाला.

ंअचलपूर : माकडाची शिकार करताना माकडांप्रमाणेच झाडावरून जमिनीवर तर जमिनीवरून झाडावर उड्या मारताना झाडाच्या दोन फांद्यांमध्ये अडकून बिबट्याचा अपघाती मृत्यू झाला. गुगामल वन्यजीव विभागाच्या हरिसाल परिक्षेत्रातील जंगलात शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता ही घटना उघडकीस आली. गुगामल वन्यजीव विभागाच्या हरिसाल परिक्षेत्रातील वनखंड क्रमांक ६३७-शेरीकुंडी परिसरात हरिसाल येथील रहिवासी गणेश शनवारे हिरव्या मांडवासाठी झाडांच्या फांद्या आणायला गेले असता त्यांच्या ही बाब निदर्शनास आली. जांभुळच्या झाडावर दोन फांद्यांमध्ये बिबट मृतावस्थेत अडकलेला आढळला. ही माहिती शनवारे यांनी महिला वन कर्मचारी कोथलकर यांना दिली. त्याआधारे गुगामल वन्यजीव विभागाचे सहायक वनसंरक्षक के. डी. पेशने, वनपाल गोंडचारे, वन कर्मचारी देशमुख, मेटकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. हरिसालचे पशुवैद्यकीय अधिकारी जावरकर यांनी शवविच्छेदन केले. मृत बिबटाचे वय साडेतीन वर्षे होते. वन नियमानुसार मृत बिबट्याला जाळण्यात आले. (तालुका प्रतिनिधी) शिकार्‍याची झाली शिकार बिबट चतुरस्त्र प्राणी असून मोठ्या शिताफीने शिकारीला पंज्यात पकडण्याचे कौशल्य असते. त्यामुळेच उंच उडी घेत शिकार करण्याच्या नादात झाडाच्या फांद्यांमध्ये अडकून बिबटाचा मृत्यू झाल्याचा अंदाज वनसूत्रांनी वर्तविला आहे. माकडाची शिकार करताना माकडाप्रमाणे उड्या मारताना बिबटाला प्राण गमवावे लागले. सीबीआयच्या चमूने केली चौकशी शुक्रवारी सकाळी बिबटयाचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आल्याने संपूर्ण वन आणि व्याघ्र प्रकल्पात खळबळ उडाली. घटांग आणि ढाकणा येथील चार वाघ आणि अस्वलाच्या शिकार प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयची चमू मेळघाटात असताना ही घटना घडली. त्यामुळे प्रथम बिबट्याची शिकार तर नव्हे, याची चौकशी करण्यात आली. झाडाच्या फांद्यामध्ये अडकून बिबट्याचा अपघाती मृत्यू झाल्याचे स्पष्ट होताच व्याघ्र अधिकार्‍यांसह क्षेत्रीय कर्मचार्‍यांचा जीव भांड्यात पडला.