शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

मनपा कर्मचारी व शिक्षकांचा दसरा, दिवाळी आनंदात; सातव्या वेतन आयोगाची ४० कोटींची थकबाकी मिळणार

By गणेश हुड | Updated: September 14, 2023 15:25 IST

यासंदर्भात मनपाचे वित्त अधिकारी सदाशिव शेळके यांनी सर्व विभाग प्रमुखांना परिपत्रक जारी केले आहे. 

नागपूर : महापालिकेतील चार हजारांहून अधिक कर्मचारीशिक्षकांना सातव्या वेतन आयोगाची ४० कोटींहून अधिक असलेली थकबाकी १२ हप्त्यात दिली जाणार आहे. सप्टेबरच्या ऑक्टोबर महिन्यात मिळणाऱ्या वेतनापासून थकबाकी मिळणार आहे. सणासुदीच्या दिवसात थकबाकी मिळणार असल्याने कमर्चाऱ्यांचा दसरा, दिवाळी आनंदात जाणार आहे. राष्ट्रीय नागपूर कार्पोरेशन एम्पाईज असोसिएशनने थकबाकी मिळावी यासाठी वेळोवेळी आंदोलन केले होते. अखेर या आंदोलनाला यश मिळाले आहे. 

महापालिकेतील नियमित कर्मचारीशिक्षकांना सातव्या वेतन आयोगाची १ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीतील ही थकबाकी दिली जाणार आहे. यासंदर्भात मनपाचे वित्त अधिकारी सदाशिव शेळके यांनी सर्व विभाग प्रमुखांना परिपत्रक जारी केले आहे. 

महापालिकेत कार्यरत  नियमित कर्मचारी व शिक्षकांना सातव्या वेतन आयोग १ जानेवारी २०१६ पासून लागू करण्यात आला आहे. यासंदर्भात ८ जानेवारी २०२१ रोजी वित्त विभागाने परिपत्रक जारी केले होती. शासनाने १ सप्टेंबर २०१९ पासून वेतन आयोगाची थकबाकी देण्याला मंजुरी दिली आहे. त्यानुसार चार हप्ते देण्यात आले. परंतु उर्वरित थकबाकी मिळाली नव्हती. यासाठी कर्मचारी संघटनेने प्रशासनाकडे ही मागणी लावून धरली.

आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडे थकबाकी देण्याची मागणी केली होती. आयुक्तांनी थकबाकी देण्याला मंजुरी दिली.  त्यानुसार सप्टेंबर २०२३ ते ऑगस्ट २०२४ अशा १२ महिन्यात ही थकबाकी मिळणार असल्याची माहिती  राष्ट्रीय नागपूर कार्पोरेशन एम्पाईज असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र टिंगणे, जनरल सेक्रेटरी रंजन नलोडे व कोषाध्यक्ष प्रवीण तंत्रपाळे यांनी दिली

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाEmployeeकर्मचारीTeacherशिक्षक