शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

दारूची तस्करी करताना एसी कोच अटेंडंटला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:19 AM

गोरखपुर एक्स्प्रेसमध्ये दारूची तस्करी करणाऱ्या बी ३ कोचच्या एसी अटेंडंटला रंगेहात अटक करून त्याच्याकडून २३६८ रुपये किमतीच्या दारूच्या ३२ बॉटल जप्त करण्यात आल्या.

ठळक मुद्देगोरखपूर एक्स्प्रेसमधील घटना : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे सोपविले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोरखपुर एक्स्प्रेसमध्ये दारूची तस्करी करणाऱ्या बी ३ कोचच्या एसी अटेंडंटला रंगेहात अटक करून त्याच्याकडून २३६८ रुपये किमतीच्या दारूच्या ३२ बॉटल जप्त करण्यात आल्या.रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त भवानी शंकर नाथ यांनी मादक पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी गठित केलेल्या टीम बीचे सदस्य सहायक उपनिरीक्षक राजेश काळे, प्रधान आरक्षक श्रवण पवार, एस. के. पाण्डेय, अनिस खान, नितेश ठमके, मुनेश कुमार गौतम हे रेल्वेगाडी क्रमांक १५०१६ गोरखपूर एक्स्प्रेसमध्ये कर्तव्य बजावत होते. त्यांना बल्लारशाह ते नागपूर दरम्यान रात्री ९.३० वाजता ए-१ कोचमध्ये एक व्यक्ती बॅगसोबत संशयास्पद स्थितीत आढळला. चौकशीत त्याने आपले नाव शुभम सुरेश मद्देसाई (२२) रा. बोदवार, कुशीनगर, उत्तर प्रदेश सांगितले. बॅगमध्ये काय आहे, अशी विचारणा केली असता त्यात दारूच्या बॉटल असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर त्यास मुद्देमालासह नागपूर रेल्वेस्थानकावर उतरवून सहायक उपनिरीक्षक एस. बी. कांबिलकर यांच्यासमोर हजर करण्यात आले. त्याच्या जवळील बॅगमध्ये कर्नाटक येथे तयार केल्या दारूच्या ३२ बॉटल आढळल्या. निरीक्षक रवी जेम्स यांच्या आदेशानुसार आरोपीला मुद्देमालासह राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन करण्यात आले.

टॅग्स :liquor banदारूबंदीNagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरArrestअटकSmugglingतस्करी