शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात बंद दरम्यान मनपाच्या १० बसेसची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 20:08 IST

भीमा कोरेगावमधील हिंसेच्या निषेधार्थ पुकारलेला 'महाराष्ट्र बंद'चे बुधवारी नागपुरात तीव्र पडसाद उमटले. आंदोलकांनी शहराच्या विविध भागात महापालिकेच्या १० बसेसची तोडफोड केली. यामुळे ६ लाखांचे नुकसान झाले. खबरदारी म्हणून दुपारी १२ नंतर शहर बस सेवा बंद ठेवल्याने ७.११ लाखांचे नुकसान झाले.

ठळक मुद्देसहा लाखांचे नुकसान : दुपारी १२ नंतर बससेवा ठप्प

आॅनलाईन लोकमतनागपूर :भीमा कोरेगावमधील हिंसेच्या निषेधार्थ पुकारलेला 'महाराष्ट्र बंद'चे बुधवारी नागपुरात तीव्र पडसाद उमटले. आंदोलकांनी शहराच्या विविध भागात महापालिकेच्या १० बसेसची तोडफोड केली. यामुळे ६ लाखांचे नुकसान झाले. खबरदारी म्हणून दुपारी १२ नंतर शहर बस सेवा बंद ठेवल्याने ७.११ लाखांचे नुकसान झाले.महापालिकेच्या आपली बस सेवेतील ३३२ बसेस बुधवारी सकाळी खापरी, पटवर्धन व हिंगणा डेपोतून निघाल्या. परंतु सकाळी ११ च्या सुमारास बंदचा प्रभाव वाढू लागला. काही भागात बसेसवर दगडफेकीच्या घटना घडल्या. प्रवाशांची सुरक्षा व बसेसचे होणारे नुकसान विचारात घेता दुपारी १२ नंतर सर्वबसेस बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला. कामठी , इंदोरा चौक, जरीपटका,शताब्दी चोक आदी ठिकाणी १० बसेसच्या काचा फोडण्यात आल्या. सुरक्षेच्या दृष्टीने बसेस बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी दिली.दगडफेकीत एमएच३१्-सीअ‍े ६१२९, एमएच३१्-सीअ‍े ६१४६, एमएच३१्-सीअ‍े ६२०२, एमएच३१्-सीअ‍े ६२४१, एमएच३१्-सीअ‍े६२४४, एमएच३१्-सीअ‍े ६१८७, एमएच३१्-सीअ‍े ६०१२ यासह अन्य तीन बसेसचा समावेश आहे. प्रत्येक बसचे सुमारे ६० हजारांचे नुकसान झाले.सात लाखांचा महसूल बुडालाआपली बसच्या ३३२ बसेस दररोज नागपूर शहरात ७७ हजार ८५७ किलोमीटर धावतात. परंतु बुधवारी ३८ हजार ९२९ किलोमटर धावल्या. दुपारी १२ पर्यत काही भागात बसेस सुरू होत्या. त्यानतंर आंदोलनाचे स्वरुप बघून टप्प्याटप्प्याने बसेस डपोत उभ्या करण्यात आल्या. यामुळे जवळपास ७ लाख ११ हजार ६५७ रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती शिवाजी जगताप यांनी दिली.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंद