शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

मॉर्निंग वॉक करताना सेवानिवृत्त अधिकाऱ्यास ट्रकने चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 20:44 IST

मॉर्निंग वॉक करण्यास गेलेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यास भरधाव ट्रकने धडक दिली. त्यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी (दि. ३०) सकाळी ६ वाजताच्या सुमारास सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर झाला.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील सावनेर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर झाला अपघातगावकऱ्यांच्या सतर्कतेने ट्रकचालक ट्रकसह ताब्यात

आॅनलाईन लोकमतनागपूर : मॉर्निंग वॉक करण्यास गेलेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यास भरधाव ट्रकने धडक दिली. त्यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी (दि. ३०) सकाळी ६ वाजताच्या सुमारास सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर झाला.मोहन अजाबराव भोसले (६०, रा. सहकारी जिनिंग फॅक्टरीसमोर, सावनेर) असे मृताचे नाव आहे. ते सार्वजनिक बांधकाम विभागातून सेवानिवृत्त झाले होते. दररोज ते ‘मॉर्निंग वॉक’साठी जात. नेहमीप्रमाणे गुरुवारीही ते मॉर्निंग वॉकसाठी गेले. दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर दूध घेऊन येणाऱ्या  एमएच-४०/एके-१४७२ क्रमांकाच्या भरधाव ट्रकने त्यांना जबर धडक दिली. त्यात ट्रकने त्यांना १५ ते २० फुटापर्यंत फरफटत नेले. त्यातच ते गंभीररीत्या जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. त्यांना शासकीय रुग्णालयात नेले असता डॉ. अशोक मुंडे यांनी तपासून मृत घोषित केले.अपघात होताच ट्रकचालकाने ट्रकसह घटनास्थळाहून पळ काढला. ही बाब नागरिकांनी सावनेर पोलिसांच्या निदर्शनास आणून देताच पोलिसांनी पांढुर्णा रोडवर ट्रकचालक प्रवीण आनंदराव कडस्कर (२४, रा. बोरखेडी, नागपूर) याला अटक केली. त्याच्या ताब्यातून ट्रक जप्त केला. याप्रकरणी सावनेर पोलिसांनी भादंविच्या कलम २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला. तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन यादव करीत आहे.

टॅग्स :Accidentअपघात