शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
4
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
5
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
6
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
7
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
8
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
9
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
10
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
11
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
12
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
13
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
14
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
15
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
16
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
17
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
18
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
19
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
20
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन

सक्करदरा तलाव की डम्पिंग यार्ड?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:07 IST

नागपूर : शहरातील जलसंपदेत महत्त्वाचे स्थान आणि ऐतिहासिक ओळख असलेल्या सक्करदरा तलावाचे अस्तित्व आता संकटात आले आहे. तलाव आहे ...

नागपूर : शहरातील जलसंपदेत महत्त्वाचे स्थान आणि ऐतिहासिक ओळख असलेल्या सक्करदरा तलावाचे अस्तित्व आता संकटात आले आहे. तलाव आहे की डम्पिंग यार्ड, अशी या तलावाची अवस्था झाली आहे. आसपासच्या वस्त्यांमधून येणाऱ्या घरातील सिवेज आणि कचऱ्यामुळे रासायनिक प्रदूषण प्रचंड वाढले असून, जैवविविधताच धोक्यात आली आहे. नीरीने महापालिकेत सादर केलेल्या तलावाच्या अहवालानुसार तलावाच्या अस्तित्वाचेच संकट निर्माण झाले आहे.

एक तर तलावात पाणी उरलेले नाही. शुद्ध पाण्याऐवजी जवळच्या वस्तीतून येणारे सांडपाणी येथे साठलेले आहे. शिवाय नागरिकांनी फेकलेल्या कचऱ्यामुळे चारही बाजूचे किनारे कचऱ्याने भरलेले आहे. त्यामुळे तलाव नसून कचराघर असल्याची स्थिती आहे. सिवेजच्या पाण्यामुळे माेठ्या प्रमाणात जलकुंभी वनस्पती वाढल्या आहेत. शिवाय झुप्लॅन्कटन्स(प्रदूषित जीवाणू)चे प्रमाणही प्रचंड वाढल्याने पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण झपाट्याने कमी झाले आहे. त्यामुळे जलचार प्राण्यांची जैवविविधताच तलावातून नष्ट झाली आहे. तलाव शुद्धीकरणाचे प्रयत्न हाेतात पण सिवेज बंद झाल्याशिवाय त्याचा काही उपयाेग हाेणार नसल्याचे मत आहे. त्यामुळे हे भाेसलेकालीन ऐतिहासिक तलाव येत्या काही वर्षांत नाईक तलावासारखे नामशेष हाेण्याची भीती पर्यावरण अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.

-वाढले प्रदूषित रासायनिक तत्त्व

नीरीच्या अहवालानुसार, तलावाच्या प्रदूषणास कारणीभूत ठरणारे सारेच तत्त्व सक्करदरा तलावात वाढले आहेत.

- तलावाची केमिकल ऑक्सिजन डिमांड (सीओडी) प्रमाणाबाहेर वाढली आहे. २०१९ ला ती १०९ मिलीग्रॅम/लिटर हाेती, जी आता १२५ वर गेली. बीओडी २०१९ मध्ये १६ मिग्रॅम/लिटर हाेते, जे यावर्षी पुन्हा वाढले आहे.

- गढूळपणा हा ५५ एनटीयूच्या पार झाला आहे.

- नायट्रेटचे प्रमाण ३.५ ते २२ मिग्रॅम/लिटरवर पाेहचले आहे. हीच अवस्था सल्फेटबाबत आहे. ते १७५ मिग्रॅ/लिटरच्या वर पाेहचले आहे.

- फाॅस्फरसचा स्तर प्रमाणाबाहेर वाढला आहे. आम्लपणा म्हणजे पीएच स्तर ८.२ च्याही पुढे आहे.

- तलावातील झुप्लॅन्कटन्स २०१९ मध्ये ५३५०/मीक्युब हाेते. म्हणजे प्रमाणापेक्षा कितीतरी अधिक. यावर्षी पुन्हा त्यात वाढ झाली आहे.

- कचरा व प्रदूषणामुळे पाण्याचा रंगही हिरवा हाेत आहे.

- पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण नगण्य असल्याचे लक्षात येते. सामान्यपणे तलावाच्या पाण्यात हे प्रमाण कमीतकमी ४.५० ते ५ मिलीग्रॅम/लिटर असायला हवे. मात्र सक्करदरा तलावात ऑक्सिजनचे प्रमाण २.५० च्याही खाली जात आहे.

२०१९ मध्ये हा तलाव साफ करण्यात आला हाेता. मात्र पुन्हा स्थिती जैसे थे झाली आहे. जाेपर्यंत तलावात येणारे आसपासच्या वस्त्यामधील सिवेज बंद हाेणार नाही आणि लाेकांचे कचरा फेकणे बंद हाेणार नाही, ताेपर्यंत स्वच्छतेचा काही उपयाेग हाेणार नाही. महापालिकेने गंभीरपणे या बाबीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा आपण हा ऐतिहासिक वारसा गमावल्याशिवाय राहणार नाही.

- काैस्तुभ चटर्जी, ग्रीन व्हिजिल संस्था

-