शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

जलजन्य आजारामुळे राज्यात ४९ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 13:41 IST

२०१५ सालापासून साडेतीन वर्षांत पावसाळ्याच्या काळात डोके वर काढणाऱ्या जलजन्य आजारांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे.

ठळक मुद्देसाडेतीन वर्षांची आकडेवारीसर्वच आजारांवर नियंत्रणाचा दावा कशाच्या आधारावर?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २०१५ सालापासून साडेतीन वर्षांत पावसाळ्याच्या काळात डोके वर काढणाऱ्या जलजन्य आजारांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे. मात्र तरीदेखील या आजारांवर नियंत्रण आणल्याचा दावा आरोग्य सेवा संचालनालयातर्फे करण्यात आला आहे. २०१५ पासून साडेतीन वर्षांत कॉलरा, गॅस्ट्रो, अतिसार, काविळ, विषमज्वर यासारख्या आजारांमुळे राज्यात ४९ बळी गेले. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत आरोग्य सेवा संचालनालयाकडे विचारणा केली होती. २०१५ ते जुलै २०१८ या कालावधीत कॉलरा, गॅस्ट्रो, अतिसार, काविळ, विषमज्वर यासारख्या आजारांची किती जणांना लागण झाली, या आजारांमुळे किती रुग्णांचा मृत्यू झाला, आजारांवर नियंत्रणासाठी किती औषधांची खरेदी झाली इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार साडेतीन वर्षांच्या कालावधीत राज्यात २१ हजार १४० नागरिकांना जलजन्य आजारांची लागण झाली. यातील ४९ जणांचा मृत्यू झाला. २०१५ मध्ये लागण झालेल्यांची संख्या ५ हजार १७५ इतकी होती. २०१६ मध्ये हा आकडा ६ हजार १२ वर पोहोचला तर तर २०१७ मध्ये ८ हजार ५४९ जणांना लागण झाली. २०१८ मध्ये जुलै महिन्यापर्यंत १ हजार ४०४ जणांना हे आजार झाले आहेत.२०१५ पासून दरवर्षी सातत्याने संख्या वाढल्याचे दिसून आले. तर २०१८ मधील पावसाळ््यातील आकडेवारी देण्यात आलेली नाही. अशा स्थितीत सर्वच आजारांवर नियंत्रण आल्याचा आरोग्य सेवा संचालनालयाचा दावा विरोधाभासी असल्याचे दिसून येत आहे.

‘गॅस्ट्रो’चा ज्वर ठरतोय धोकादायक२०१५ सालापासून ‘कॉलरा’, अतिसार, विषमज्वर यांची लागण झालेल्या रुग्णांची संख्या घटली आहे. मात्र ‘गॅस्ट्रो’ हा सर्वाधिक धोकादायक ठरतो आहे. साडेतीन वर्षांत ९ हजार ८२२ नागरिकांना याची लागण झाली व २६ नागरिकांचा बळी गेला. ९ हजार ४० नागरिकांना अतिसाराची लागण झाली व १० जणांचा जीव गेला.

टॅग्स :Healthआरोग्य