शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

‘वायु’ चक्रीवादळाने मान्सून लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 00:30 IST

जून महिन्याचा तिसरा आठवडा संपत आला आहे. तरीही मान्सूनचा पत्ता नाही. इतकेच नव्हे तर मान्सूनपूर्व पडणाऱ्या मुसळधार पावसाचीही प्रतीक्षा आहे. काही दिवसापूर्वी पावसाला सुरुवात झाली होती. परंतु ‘वायु’ चक्रीवादळामुळे मान्सून लांबणीवर पडला आहे. नागपूरकरांना मान्सूनच्या पावसासाठी किमान २५ जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल, असा अंदाज वर्तविला जात आहे.

ठळक मुद्देउकाड्याने नागपूरकर त्रस्त 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जून महिन्याचा तिसरा आठवडा संपत आला आहे. तरीही मान्सूनचा पत्ता नाही. इतकेच नव्हे तर मान्सूनपूर्व पडणाऱ्या मुसळधार पावसाचीही प्रतीक्षा आहे. काही दिवसापूर्वी पावसाला सुरुवात झाली होती. परंतु ‘वायु’ चक्रीवादळामुळे मान्सून लांबणीवर पडला आहे. नागपूरकरांना मान्सूनच्या पावसासाठी किमान २५ जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल, असा अंदाज वर्तविला जात आहे.नागपूरच्या आकाशात ढग दाटून येत होते. परंतु ‘वायु’ चक्रीवादळाने जोर पकडताच नागपूरसह विदर्भातील आकाशातून काळे ढग निघून गेले आहेत. शुक्रवारी पूर्व नागपूरसह शहरातील काही भागात जोरदार हवा आणि पावसाच्या काही सरी पडल्या. काही मिनिटाच्या या पावसामुळे उकाडा आणखी वाढला आहे. मागील काही दिवसांपासून नागपूरकर उकाड्यामुळे त्रस्त आहेत.नागपुरात १० जूनपर्यंत मान्सून पोहोचतो. परंतु यंदा दक्षिण भारतातच मान्सून आठ दिवस विलंबाने पोहोचला. त्यानंतर वायु चक्रीवादळाने मान्सूनच्या गतीला प्रभावित केले आहे. अशा परिस्थितीत नागपुरात जो मान्सून २० जून रोजी सक्रिय होणार होता. तो आणखी लांबला आहे. वायु चक्रीवादळामुळे ढगांची आर्द्रताही प्रभावित झाली आहे. त्यामुळे नागपुरात जून महिन्यातही पारा सरासरीपेक्षा जास्त आहे. शुक्रवारी दिवस आणि रात्रीचे तापमान सरासरीपेक्षा तीन डिग्री अधिक म्हणजे ४३ आणि ३०.५ डिग्री सेल्सियस नोंदवण्यात आले आहे.संपूर्ण विदर्भच तापतोयसाधारणपणे जूनच्या मध्यात पाऊस होतो. परंतु सध्या पूर्ण विदर्भातच दुष्काळसदृश परिस्थिती आहे. सध्या विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये दिवस व रात्रीचे तापमान सरासरपेक्षा तीन ते पाच डिग्री सेल्सियसने अधिक आहे. यामुळे ही कडक उन त्रासदायक ठरत आहे. जून महिन्यात ४० डिग्रीपेक्षा कमी तापमान राहते. यंदा सर्व जिल्ह्यातील तापमान अधिक आहे. शुक्रवारी ४४.६ डिग्री तापमानासह चंद्रपूर सर्वाधिक उष्ण राहिले. याशिवाय ब्रह्मपुरी ४४.५ डिग्री सेल्सियस, गडचिरोली ४४.२, वर्धा ४३, अकोला ४२.२, अमरावती ४०.८, यवतमाळ ४०.५, वाशिम ४०, बुलडाणा ३९ डिग्री सेल्सियस कमाल तापमान नोंदवण्यात आले आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसnagpurनागपूर