शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

विमान न मिळाल्याने हरले हृदय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 01:27 IST

देशाच्या मध्यभागी असतानाही व राज्याच्या उपराजधानीचा दर्जा असतानाही नागपुरातून मानवी अवयव पाठविण्यासाठी वेळेवर घरगुती विमान उपलब्ध होत नसल्याची उदाहरणे समोर आली आहेत. मंगळवारी विमान उपलब्ध न झाल्यामुळे ब्रेन डेड रुग्णाचे हृदय व फुफ्फुस दान देता आले नाही. यकृत नागपुरातील रुग्णाला दान देण्यात आले. २०१३ पासून आजवर नागपुरात ३३ ब्रेन डेड रुग्णांचे अवयव दान करून प्रत्यारोपण करण्यात आले. नागपुरातील हे चौथे यकृत प्रत्यारोपण होते.

ठळक मुद्देनागपुरात चौथे लिव्हर ट्रान्सप्लांट : चार जणांना जीवनदान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशाच्या मध्यभागी असतानाही व राज्याच्या उपराजधानीचा दर्जा असतानाही नागपुरातून मानवी अवयव पाठविण्यासाठी वेळेवर घरगुती विमान उपलब्ध होत नसल्याची उदाहरणे समोर आली आहेत. मंगळवारी विमान उपलब्ध न झाल्यामुळे ब्रेन डेड रुग्णाचे हृदय व फुफ्फुस दान देता आले नाही. यकृत नागपुरातील रुग्णाला दान देण्यात आले. २०१३ पासून आजवर नागपुरात ३३ ब्रेन डेड रुग्णांचे अवयव दान करून प्रत्यारोपण करण्यात आले. नागपुरातील हे चौथे यकृत प्रत्यारोपण होते.वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यातील धनोडी बहादुरपूर येथील रहिवासी सुनील शंकरराव शेराम (३३) यांचे ३ जून रोजी भांडण झाले होते. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी येथे उपचारासाठी दाखल केल्यानंतर त्यांचे ‘ब्रेनहेमरेज’ झाल्याचे सांगण्यात आले व ४ जून रोजी त्यांना ब्रेनडेड घोषित करण्यात आले. त्यांच्या भावाने हृदय, फुफ्फूस, यकृत, किडनी व कार्निया दान देण्याची परवानगी दिली होती. यानंतर राज्य, विभाग व राष्ट्रीय आॅर्गन अ‍ॅण्ड टिशू ट्रान्सप्लांट आॅर्गनायझेशन(नोटो) यांनाही याची माहिती देण्यात आली. दरम्यान, चेन्नई येथे गरजू रुग्ण मिळाला. मात्र, विमान उपलब्ध नसल्यामुळे अवयव पाठविण्यात येऊ शकले नाहीत. यानंतर यकृत सावंगी येथून ‘ग्रीन कोरिडोर’ करून नागपुरातील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये आणून प्रत्यारोपण करण्यात आले. एक किडनी व कार्निया सावंगी रुग्णालयात तर दुसरी किडनी आॅरेंज सिटी इस्पितळाला देण्यात आली. झोनल ट्रान्सप्लांट कॉर्डिनेशन कमिटीच्या अध्यक्ष डॉ.विभावरी दाणी, उपाध्यक्ष डॉ.वीरेश गुप्ता,समन्वयक वीणा वाठोरे, हॉस्पिटलची चमू डॉ.चंद्रशेखर महाकाळकर, डॉ.संदीप इरटवार, डॉ.हेमंत देशपांडे, डॉ.अमोल सिंघम, डॉ.संजय कोलते,डॉ.अभिजित धाले, डॉ. मनीषे बलवानी, डॉ.अमोल बावने यांनी यात महत्त्वाची भूमिका बजावली. किडनी प्रत्यारोपण डॉ.संदीप देशमुख, डॉ.एस.जे.आचार्य, यकृत प्रत्यारोपण गौरव गुप्ता, डॉ.अनुराग श्रीमल, डॉ.अंजली पत्की,डॉ.सौरभ कामत, डॉ.दिनेश झिरपे आदींनी केले.

टॅग्स :Organ donationअवयव दानnagpurनागपूर