शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

‘सनद’नसल्याने ग्रामीण भागात खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प

By गणेश हुड | Updated: July 6, 2023 16:35 IST

वास्तव्य असूनही मालकी हक्काचा पुरावा नसल्याने घराची रजिस्ट्री नाही

 नागपूर : वाढत्या लोकसंख्येमुळे मूळ गावठाण कमी पडल्याने  गावागावात विस्तारितगावठाण निर्माण झाले. गावालगतच्या शेतजमिनीत लोकांनी घरे उभारली. परंतु विस्तारित गावठाण आणि खाजगी जमिनीवर बांधण्यात आलेल्या घरांना मालकी हक्काचा पुरावा म्हणून सनद वाटप बंद असल्याने अशा मालमत्तांचे खरेदी -विक्रीचे व्यवहार ठप्प आहेत. यामुळे ग्रामीण भागातील लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. 

राज्यातील सर्व गावांच्या गावठाणामधील मालमत्तांचे जीआयएस प्रणालीवर आधरित मालमत्ता पत्रक तयार करण्याची महत्वाकांक्षी योजना राज्यात राबविण्यात येत आहे  राज्याचा ग्रामविकास, भूमिअभिलेख आणि भारतीय सर्वेक्षण विभागाच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला. मात्र यात विस्तारित गावठाण व गावालगतच्या शेतजमिनीवरील घरांचे सर्वेक्षण करण्यात आलेले नाही. या घरांच्या रजिस्ट्रीसाठी गावठाण प्रमाणपत्र व टॅक्स पावती किंवा सनद लागते.  दर चार वर्षांनी मोजणी होवून कर आकारणीच्या पावतीवर रजिस्ट्री होत होत्या. विस्तारित गावठाणातील रहिवाशांकडे घराचे कोणतेही कागदपत्रे नसल्याने रजिस्ट्री करता येत नसल्याने खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद आहेत. विस्तारित गावठाणांतील रहिवाशांना सदन द्यावी

सनद म्हणजे शेतजमिनीचे अकृषीमध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया, शासनाने विस्तारीत गावठाण किंवा गावठाणालगतच्या जमिनीची मोजणी करून  येथील जागा मालकाला सनद स्वरूपात मालकी हक्क द्यावा,  विस्तारित व खाजगी जमिनीवरील बांधकामे  नियमित करावी. अशी मागणी जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास सभापती अवंतिका लेकुरवाळे यांनी केली आहे.

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकासnagpurनागपूर