शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

आचारसंहितेमुळे दोन महिने पट्टेवाटप ठप्प, मतमोजणीनंतर वाटपाला मिळणार गती 

By गणेश हुड | Updated: March 30, 2024 15:12 IST

पट्टे वाटपाची प्रक्रीया सुरू होती. परंतु लोकसभा निवडणुकीमुळे दोन महिने पट्टे वाटपाला ब्रेक लागले आहे. 

नागपूर : महाराष्ट्र सरकारच्या धोरणांतर्गत नागपूर शहरातील झोपडपट्टीधारकांना मालकी पट्टे पंजीबद्ध (रजिस्ट्री) करून देण्याची प्रक्रीया मागील सहा वर्षापासून सुरू आहे. आजवर साडेसात हजार झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटप करण्यात आले आहे. पट्टे वाटपाची प्रक्रीया सुरू होती. परंतु लोकसभा निवडणुकीमुळे दोन महिने पट्टे वाटपाला ब्रेक लागले आहे. . महापालिका,नासुप्र व नझुलच्या जागेवर वसलेल्या  शहरातील अधिकृत झोपडपट्ट्यातील ७ हजार ५००  झोपडपट्टीधारकांना मालकीपट्ट्याची रजिस्ट्री करून मिळाली. मात्र लोकसभानिवडणुकीचीआचारसंहिता लागू झाल्यापासून पट्टे वाटपाचे काम ठप्प झाले आहे. शहरातील जवळपास एक लाख झोपडपट्टीधारकांना  पट्टे वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र ही प्रक्रीया संथ असल्याने पट्टे वाटपाला अपेक्षीत गती मिळालेली नाही. आता मतमोजणीनंतर या प्रक्रियेला गती मिळणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. राज्य शासनाने झोपडपट्टीधारकांना मालकी पट्टे देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा लाभ शहरातील एक लाखाहून अधिक अधिक लोकांना  मिळणार आहे. शहरातील नासुप्रच्या मालकीच्या जागेवरील वस्त्यातील ४ हजार झोपडपट्टीधारकांना मालकी पट्टे देण्यात आले  आहे. महापालिकेच्या जागेवरील ज्वळपास दिड हजार लोकांना  मालकी पट्टे देण्यात आले.   पूर्व नागपुरातील कुंभार टोली, पडोळेनगर,आदर्शनगर,डिप्टीसिग्नल, हिवरीनगर, नेहरूनगर, पँथरनगर, प्रजापतीनगर, साखरकरवाडी, संघर्षनगर, सोनबानगर, उत्तर नागपुरातील इंदिरा नगर व कस्तुरबा नगर आदी भागातील काही झोपडपट्टीधारकांना रजिस्ट्री मिळालेल्या आहे. नासुप्रच्या दक्षिण नागपूर विभागातील हसनबाग, जाटतरोडी, न्यू नेहरूनगर, स्वातंत्र्यनगर नंदनवन या वस्त्यात पट्टे वाटप करण्यात आले. पश्चिम विभागातील पांढराबोडी भागातील झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटप करण्यात आले आहे. महापालिकेतर्फे पूर्वतील मेहतरपुरा, दक्षिण पश्चिममधील सुदर्शननगर, फकिरावाडी, रामबाग व बोरकरनगर, बन्सोड मोहल्ला या वस्त्यातील  झोपडपट्टीधारकांना रजिस्ट्री देण्यातआली आहे. मात्र अजूनही हजारो लोकांना पट्टे वाटप झालेले नाही. त्यात निवडणूक आचारसंहितेमुळे पट्टे वाटपाला ब्रेक लागले आहे.

टॅग्स :nagpurनागपूरElectionनिवडणूकlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४