शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

मुंबईच्या खराब हवामानामुळे नागपुरातून हृद्य गेले एक दिवस उशीरा

By सुमेध वाघमार | Updated: May 14, 2024 18:36 IST

अवयवदानासाठी जैन कुटुंबियांचे सहकार्य : चौघांना मिळाले नवे आयुष्य

नागपूर : एका ‘ब्रेन डेड’ अवयवदात्याचे हृद्य सोमवारी मुंबईच्या रिलायन्स हॉस्पिटलला जाणार होते. परंतु मुंबईतील खराब हवामानामुळे विमानसेवा प्रभावित झाली. यामुळे एक दिवस थांबवून आज मंगळवारी अवयवदान झाले. विशेष विमानाने हृद्य मुंबईला नेण्यात आले. अवयवदात्याच्या कुटुंबियांच्या सहकार्यामुळेच हे शक्य होऊ शकले.    

जिनेन्द्र जैन (४४) रा. खरबी नागपूर त्या अवयवदात्याचे नाव. जैन यांचे शंकर नगर येथे पान मटेरियले दुकान आहे. ११ मे रोजी रात्री ११ वाजात दुकान बंद करून ते घरी जाण्यास निघाले असताना पंचशील चौकात त्यांचा अपघात झाला. सीताबर्डी कडून आलेल्या भरधाव कराने त्यांना धडक दिली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. लागलीच त्यांना केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दोन दिवसाच्या उपचारानंतर डॉक्टरांच्या एका पथकाने ब्रेन डेड म्हणजे मेंदू मृत झाल्याची घोषणा केली. हॉस्पिटलचे डॉ. कमाल भुतडा व त्यांच्या चमूने याची माहिती जैन यांच्या कुटुंबियांना देऊन अयवदानासाठी समुपदेशन केले. अचानक झालेल्या घटनेने जैन कुटुंब हादरून गेले होते. मात्र त्या दु:खातही त्यांचे वडील रमेश जैन (६५), जिनेन्द्र यांच्या पत्नी भावना (३९) आणि भाऊ योगेश (३२) यांनी अवयवदानाला संमती दिली. याची माहिती विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीला  (झेडटीसीसी) देण्यात आली. समितीचे अध्यक्ष डॉ. संजय कोलते व सचिव डॉ. डॉ. राहुल सक्सेना यांच्या मार्गदर्शनात प्रत्यारोपण समन्वयक दीनेश मंडपे यांनी अवयवदानाची प्रक्रीया पार पडली. चौघांना अवयवदान होऊन नवे आयुष्य मिळाले.

-सोमवारी होणारे प्रत्यारोपण मंगळवारी झाले‘झेडटीसीसी’ने नियमानुसार राज्य व राज्याबाहेर हृद्य उपलब्ध असल्याचा अलर्ट दिला. सोमवारी मुंबईच्या सर एच.एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमधील एका ५३ वर्षीय रुग्णाला हृद्य दान करण्याचा निर्णय झाला. त्याच दिवशी नागपुरात जैन यांचे अवयवदान होणार होते. परंतु मुंबईच्या खराब हवामानामुळे विशेष विमान नागपुरला पोहचू शकले नाही. यामुळे मंगळवारी सकाळी अवयवदान झाले.

-रामदासपेठ ते विमानतळ ग्रीन कॉरिडॉररामदासपेठ येथील केअर हॉस्पिटल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्टÑीय विमानतळ असे ‘ग्रीन कॉरिडॉर’ करून रुग्णवाहिकेतून हृद्य नेण्यात आले. यकृत नागपुरातील न्यू इरा हॉस्पिटलमधील ३६ वर्षीय तरुणाला, एक किडनी के अर हॉस्पिटलमधील ४६ वर्षीय पुरुष रुग्णाला तर दुसरी किडनी आॅरेंज सिटी हॉस्पिटलच्या ३८ वर्षीय तरुणाला दान करण्यात आली.

-आतापर्यंत केवळ १९ हृद्याचे दान२०१३ ते आतापर्यंत १५० ब्रेन डेड व्यक्तीकडून अवयवदान झाले असलेतरी मोजक्याच दात्याकडून १९ हृद्याचे दान होऊ शकले. यात २०१७ मध्ये ५, २०१८ मध्ये ४, २०१९ मध्ये ३, २०२१ मध्ये २, २०२३मध्ये ४ तर २०२४ मधील हे पहिले हृद्यदान होते.

टॅग्स :Mumbaiमुंबईnagpurनागपूर