शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

एसटीच्या संपामुळे प्रवाशांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 00:19 IST

वेतनवाढीवर नाराज असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी मध्यरात्रीपासून पुन्हा संप पुकारल्यामुळे एसटी बसेसची चाके थांबली आहेत. नागपूर विभागातील ७० टक्के फेऱ्या संपामुळे रद्द करण्याची पाळी प्रशासनावर आली. दरम्यान संपामुळे नागपूर विभागाचे ३५ लाखाचे नुकसान झाल्याची माहिती असून यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाल्याचे पाहावयास मिळाले.

ठळक मुद्दे७० टक्के फेऱ्या रद्द : नागपूर विभागाचे ३५ लाखाचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वेतनवाढीवर नाराज असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी मध्यरात्रीपासून पुन्हा संप पुकारल्यामुळे एसटी बसेसची चाके थांबली आहेत. नागपूर विभागातील ७० टक्के फेऱ्या संपामुळे रद्द करण्याची पाळी प्रशासनावर आली. दरम्यान संपामुळे नागपूर विभागाचे ३५ लाखाचे नुकसान झाल्याची माहिती असून यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाल्याचे पाहावयास मिळाले.परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी घोषित केलेल्या वेतनवाढीवर नाराजी व्यक्त करुन एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने शुक्रवारी मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे. विभागातील ७० टक्के कर्मचारी गैरहजर होते. संप पुकारण्यात आल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी सकाळीच गणेशपेठ आगारात घोषणाबाजी करून बसेस बाहेर काढण्यास मनाई केली. एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात दिवसाकाठी बसेसच्या १०५२ फेऱ्या होतात. संपामुळे फक्त २७४ फेऱ्या पूर्ण झाल्या असून ७७८ फेऱ्या रद्द करण्याची पाळी महामंडळावर आली. गणेशपेठ स्थानकावर प्रवासी पोहोचल्यानंतर त्यांना संप पुकारल्याचे समजले. त्यामुळे प्रवासासाठी त्यांना खाजगी वाहतुकीकडे वळण्याची पाळी आली.नागपूर विभागातील आकडेवारीएकूण बसेस ६००दैनंदिन फेऱ्या  १०५२पूर्ण झालेल्या फेऱ्या २७४रद्द केलेल्या फेऱ्या ७७८एकूण कर्मचारी २८००चालक १ हजारवाहक १ हजारकार्यशाळा कर्मचारी ५००कार्यालयीन कर्मचारी ३००खाजगी गाड्यांना वाहतुकीची परवानगीप्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचना महामंडळाकडून विभाग नियंत्रक कार्यालयाला देण्यात आल्या आहेत. त्यानुसार खासगी गाड्यांनाही प्रवासी वाहतुकीची मान्यता देण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यासाठी विभाग नियंत्रक कार्यालयात एक कक्ष सुरू करण्यात आला आहे. 

खासगी बसेस व वाहनास प्रवासी वाहतुकीची परवानगी

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा (एस.टी.) च्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने खासगी बसेस, स्कूल बसेस, कंपन्यांच्या मालकीच्या बसेस व मालवाहू वाहनास संपाच्या काळात प्रवासी वाहतुकीची परवानगी दिली आहे.प्रादेशिक परिवहन विभागाच्या मोटर वाहन अधिनियम १९८८ (चा ५९)चे कलम ६६ चे उपकलम (३) चा खंड (एन) अन्वये खासगी वाहनांना संप कालावधीकरिता सूट देण्यात आली आहे. संप कालावधीत प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी (ग्रामीण) नागपूर यांनी केले आहे.

टॅग्स :ST Strikeएसटी संपnagpurनागपूर