शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

लेन्स नसल्याने मोतीबिंदूच्या १७ लाख शस्त्रक्रिया प्रलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2018 05:12 IST

महाराष्ट्र मोतीबिंदू मुक्त करण्याच्या उद्देशाने सरकारने मोहिम हाती घेतली आहे.

- सुमेध वाघमारे नागपूर : महाराष्ट्र मोतीबिंदू मुक्त करण्याच्या उद्देशाने सरकारने मोहिम हाती घेतली आहे. परंतु या शस्त्रक्रियेसाठी लागणारे ‘लेन्स’ व इतर साहित्याचा पुरवठा आरोग्य विभागाकडूनच गेल्या सहा महिन्यांपासून देणे बंद झाल्याने या मोहिमेला ग्रहण लागले आहे. महाराष्टÑात सुमारे १७ लाख मोतीबिंदू रुग्णांच्या शस्त्रक्रिया प्रलंबित आहेत. यातील सुमारे पाच लाख रुग्णांवर तातडीने शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे.‘राष्टÑीय अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गत दरवर्षी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या व एनजीओ हॉस्पिटल्सना मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे लक्ष्य दिल्या जाते. हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी ‘रिजीड लेन्स’सोबतच ‘व्हीस्कोमॅट’ व ‘डिस्पोजेबल सर्जिकल ब्लेड’ मागणीनुसार उपलब्ध करून दिले जाते. परंतु एप्रिल २०१८ पासून साहित्याचा पुरवठाच करण्यात आलेला नाही. परिणामी, मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया प्रभावित झाल्या आहेत.नागपूरच्या मेयो, मेडिकलमध्ये सर्वाधिक मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया होतात. या रुग्णालयाने या वर्षी एक हजार लेन्सची मागणी केली होती. परंतु पुरवठा न झाल्यानेगडचिरोली जिल्ह्यातील १५० लेन्स आणण्यात आल्या, अशी माहिती सूत्रांनी दिली.>मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी लागणारे लेन्स व इतर साहित्य आरोग्य विभागाकडून एप्रिलपासून मिळालेले नाही.-डॉ. देवेंद्र पातुरकरजिल्हाशल्यचिकित्सक, नागपूर