शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
2
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
3
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास
4
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
5
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
6
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
7
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
8
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
9
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
10
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
11
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
12
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
13
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
14
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
15
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
16
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
17
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
18
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
19
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
20
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात तपासणी शुल्कपोटी कॅन्सर रुग्ण रडकुंडीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 20:52 IST

कॅन्सरच्या काळजीने काळवंडलेले चेहरे, असह्य वेदनांची झळ, खचत चाललेल्या देहात नाउमेद झालेले मन, त्यात खिशात जेमतेम पैसे, कालपर्यंत या रुग्णांना शासकीय रुग्णालयात सर्व तपासण्या नि:शुल्क व्हायच्या तिथे आज शुल्क लागत असल्याने अनेक कॅन्सर रुग्ण अडचणीत आले आहेत. नागपूर मेडिकलने कॅन्सरच्या सर्व रुग्णांना शुल्क माफ करण्याचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठविला, परंतु दोन महिन्यांवर कालावधी होत असताना याला मंजुरी मिळाली नसल्याने गरीब रुग्ण रडकुंडीला आले आहे.

ठळक मुद्देशुल्क माफीच्या प्रस्तावाल मंजुरीची प्रतीक्षा : केवळ रक्ताच्या कॅन्सरलाच शुल्क माफ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कॅन्सरच्या काळजीने काळवंडलेले चेहरे, असह्य वेदनांची झळ, खचत चाललेल्या देहात नाउमेद झालेले मन, त्यात खिशात जेमतेम पैसे, कालपर्यंत या रुग्णांना शासकीय रुग्णालयात सर्व तपासण्या नि:शुल्क व्हायच्या तिथे आज शुल्क लागत असल्याने अनेक कॅन्सर रुग्ण अडचणीत आले आहेत. नागपूर मेडिकलने कॅन्सरच्या सर्व रुग्णांना शुल्क माफ करण्याचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठविला, परंतु दोन महिन्यांवर कालावधी होत असताना याला मंजुरी मिळाली नसल्याने गरीब रुग्ण रडकुंडीला आले आहे.राज्यातील शासकीय रु ग्णालयांमध्ये येणारा ८० टक्के रुग्ण हा गरीब असतो. म्हणूनच की काय, या रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधा पुरेशा नाहीत. वैद्यकीय क्षेत्रात झालेली नवनवीन संशोधने आणि बदललेल्या तंत्रज्ञानाचा फायदा येथील रुग्णांना लवकर मिळत नाही. अशा स्थितीत शासनाने सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांच्या (मेडिकल) विविध शुल्कात जानेवारी २०१८ पासून २५ टक्क्यांनी वाढ केली. नोंदणी शुल्क १० रुपयांवरून २० रुपये केले. विविध चाचण्यासह, उपचार, शस्त्रक्रिया, वॉर्ड, अतिदक्षता विभागाच्या शुल्कात भरमसाठ वाढ केली. पूर्वी या सर्व शुल्कातून कॅन्सर रुग्णांना वगळण्यात आले होते. यामुळे कॅन्सरसारख्या रुग्णांना थोडातरी आधार व्हायचा. औषधोपचार घेत होते. परंतु जानेवारी महिन्यापासून रक्ताचा कर्करोग सोडल्यास इतर सर्व कॅन्सर रुग्णांना शुल्काचा भुर्दंड पडत असल्याने चित्रच पालटले. कॅन्सर रुग्णाना विविध रक्त, मल, मूत्राच्या तपासण्यासह एक्स-रे, सिटी स्कॅन काही प्रकरणात एमआरआयही करावा लागतो. तर ज्यांचे निदान झाले त्यांना किमोथेरपी, रेडिएशन, शस्त्रक्रिया कराव्या लागतात. परंतु जेमतेम पैसे घेऊन मेडिकलमध्ये चांगल्या उपचाराचा आशेने येणाऱ्या रुग्णांचा हिरमोड होत आहे. रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना असलीतरी ही योजना कॅन्सरचे निदान झाल्यावरच मदत करते, मात्र रुग्णांकडे याचे निदान करण्याइतपतही पैसे राहत नसल्याने ते उपचारापासून वंचित राहत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. फेब्रुवारी महिन्यात पाठविला होता प्रस्तावकॅन्सर रुग्णांच्या वाढत्या तक्रारीला घेऊन नागपूर मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी सर्वच कॅन्सर रुग्णांना मेडिकलच्या विविध शुल्कातून वगळण्याचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाला फेब्रुवारी महिन्यात पाठविला. परंतु दोन महिने होऊनही विभागाकडून अद्यापही उत्तर प्राप्त झालेले नाही.सिटी स्कॅन माफ करून द्या!बुटीबोरी येथून आपल्या ५८ वर्षीय पतीसोबत आलेली त्यांची पत्नी सुनीता कांबळे या मेडिकलच्या कॅन्सर विभागातील डॉक्टरांना नि:शुल्क सिटी स्कॅन करण्यासाठी हात जोडून विनंती करीत होत्या. त्यांना बोलते केल्यावर त्या म्हणाल्या, यांच्या छातीत कॅन्सरची गाठ आहे, असे डॉक्टर म्हणतात. त्याची तपासणी करण्यासाठी सिटी स्कॅन लिहून दिले. परंतु यासाठी ३५० रुपये भरा असे म्हणतात. रोजी पाडून आलो, हातात १५० रुपये आहे. त्यानंतर रक्ताची तपासणी करण्यासही सांगितले, एवढा पैसा नाही आहे जी, असे म्हणत त्या पुन्हा डॉक्टरांच्या मागे लागल्या. हे चित्र केवळ नागपूर मेडिकलचेच नाही तर राज्यभरातील मेडिकलचे आहे.मेडिकलमधील कॅन्सर रुग्णांना शुल्क माफ करण्याचा प्रस्ताव माझ्यापर्यंत पोहचला नाही. परंतु अधिकाऱ्यांशी बोलून यावर नक्कीच विचार करून सकारात्मक निर्णय घेता येईल.गिरीश महाजनवैद्यकीय शिक्षण मंत्री

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयcancerकर्करोग