शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

‘जीएसटी व रेरा’मुळे बांधकाम क्षेत्राला मिळाले ‘बूस्ट’ : राजीव पारिख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 23:21 IST

‘जीएसटी आणि रेरा’मध्ये झालेल्या बदलांमुळे महाराष्ट्रात बांधकाम क्षेत्रात उत्साह आहे. याचा फायदा व्यावसायिक बिल्डरांसह ग्राहकांनाही होत आहे. याची प्रचिती यंदाच्या आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत दिसून आल्याचे मत क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष राजीव पारिख यांनी येथे व्यक्त केले.

ठळक मुद्देसर्वसमावेशक बांधकाम नियमावलीचा फायदा होणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘जीएसटी आणि रेरा’मध्ये झालेल्या बदलांमुळे महाराष्ट्रात बांधकाम क्षेत्रात उत्साह आहे. याचा फायदा व्यावसायिक बिल्डरांसह ग्राहकांनाही होत आहे. याची प्रचिती यंदाच्या आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत दिसून आल्याचे मत क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष राजीव पारिख यांनी येथे व्यक्त केले.अध्यक्षपदाचा पदभार सांभाळल्यानंतर ते महाराष्ट्रातील ५२ चॅप्टरच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. त्यांनी शुक्रवारी भंडारा, गोंदियासह क्रेडाई नागपूर मेट्रोच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, के्रडाईच्या पाठपुराव्यानंतर राज्य शासनाने सर्वसमावेशक बांधकाम नियमावली तयार केली असून, ८ मार्चला जाहीर केली आहे. त्याआधारे पारदर्शकता येऊन ग्राहकांना आकर्षित करता येईल आणि इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये परवानग्या मिळतील. यात एफएसआय, पार्किंग, साईड मार्जिनमध्ये बदल केले आहेत. त्यामुळे तफावत दूर होईल. याशिवाय लॅण्ड टायटलिंगमध्ये राज्यात रजिस्ट्री, नोंदणी, मोजणी या तीन विभागाची कामे एकाच ठिकाणी होतील. यामुळे खरेदी-विक्रीत पारदर्शकता येईल. याकरिता नायब तहसीलदाराची नेमणूक करण्यात येणार आहे. हे बिल यंदाच्या विधानसभा सत्रात पटलावर ठेवण्यात आले होते. राज्य शासनातर्फे करण्यात येणाऱ्या सॅटेलाईट सर्वेचा उपयोग लॅण्ड टायटलिंग बिलासाठी होणार आहे.परवडणाऱ्या घरांच्या योजनेत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. क्रेडाईचे बिल्डर सदस्य लक्ष्यानुसार काम करीत आहेत. केंद्राच्या उद्दिष्टानुसार २०२२ पर्यंत सर्वांना घर उपलब्ध होणार आहे. यामध्ये सरकारने एक हजाराचे मुद्रांक शुल्क लावले आहे. याशिवाय ग्रीन झोनमध्ये एक एफएसआय जाहीर केला आहे. त्याचा फायदा योजनेच्या लक्ष्यपूर्तीसाठी होत असल्याचे पारिख यांनी स्पष्ट केले.महाराष्ट्रात रेराचे प्रमुख गौतम चॅटर्जी यांनी पारदर्शक यंत्रणा उभी केली आहे. नोंदणी ऑनलाईन आहे. या कायद्यांतर्गत महाराष्ट्रात १५ हजारांपेक्षा जास्त प्रकल्पांची नोंदणी झाली आहे. क्रेडाईच्या सकारात्मक भूमिकेमुळे बिल्डर चांगला व्यवसाय करीत आहेत. त्यांना रेराचा फायदा मिळत असून, हा कायदा क्रांतिकारी पाऊल आहे. पुढे यात काही बदल होणार असल्याचे पारिख यांनी सांगितले. केंद्रीय अर्थसंकल्पात गृहकर्जात सुधारणा आणि रेरामध्ये बदल करण्याची मागणी केली आहे. के्रडाईने नॅशनल फर्स्ट घोषवाक्य जाहीर केले आहे.याप्रसंगी क्रेडाई महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष प्रशांत सरोदे व संतदास चावला, सचिव सुनील कोतवाल, उपाध्यक्ष रवी वट्टमवार, समिती चेअरमन शैलेश वानखेडे, क्रेडाई नागपूर मेट्रोचे अध्यक्ष महेश साधवानी उपस्थित होते.

 

टॅग्स :GSTजीएसटीRera act Maharashtra 2017महारेरा कायदा 2017