शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
7
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
8
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
9
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
10
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
11
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
12
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
13
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
14
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
15
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
16
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
17
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
18
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
19
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
20
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...

धुक्यामुळे नागपुरातील विमानसेवा प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 00:53 IST

नागपूर शहरात मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असून पाऊसही पडत आहे. यातच धुक्याने संपूर्ण शहराला व्यापले आहे. याचा परिणाम विमान सेवेवरही पडला आहे. विमानसेवा प्रभावित झाली असून, १२ पेक्षा अधिक विमानांना उशीर झाला. नागपूर ते मुंबई, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद आणि कोलकाता विमानसेवा प्रभावित झाली.

ठळक मुद्दे१२ विमानांना उशीर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहरात मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असून पाऊसही पडत आहे. यातच धुक्याने संपूर्ण शहराला व्यापले आहे. याचा परिणाम विमान सेवेवरही पडला आहे. विमानसेवा प्रभावित झाली असून, १२ पेक्षा अधिक विमानांना उशीर झाला. नागपूर ते मुंबई, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद आणि कोलकाता विमानसेवा प्रभावित झाली.सोमवारी धुक्यामुळे इंडिगो एअरलाईन्सचे ६ ई ४२७ बंगळुरू-नागपूर विमान तब्बल ५५ मिनिटे उशिराने सायंकाळी ७.२० वाजता पोहोचले. ६ ई ७१३६ हैदराबाद-नागपूर २१ मिनिटे उशिरा, ६ ई ३५६ बंगळुरू ते नागपूर ५२ मिनिटे, जेटलाईटचे एस-२ ८७९ मुंबई- नागपूर ३५ मिनिटे उशिरा म्हणजे सायंकाळी ५.५५ वाजता आले. इंडिगोचे ६ ई ४०३ मुंबई-नागपूर १.३६ तास उशिरा सायंकाळी ७.६ वाजता पोहोचले. ६ ई ४३६ इंदूर-नागपूर २४ मिनिटे उशिरा ८.१९ वाजता, जेटलाईटचे ८६५ मुंबई-नागपूर विमान रात्री एक तास उशिराने १०.२० वाजता उतरले. इंडिगोचे दिल्ली-नागपूर विमान अर्धा तास उशिरा म्हणजे रात्री १० वाजता आले. गो एअरचे नागपूर-मुंबई जी ८-८११ हे विमान पहाटे ५.४२ वाजेऐवजी तासभर उशिराने रवाना झाले. जेटचे नागपूर-दिल्ली ९ डब्ल्यू ६५३ हे विमान २२ मिनिटे उशिराने उडाले. जेटलाईटचे एस-२ ८८० नागपूर-मुंबई विमान जवळपास एक तास उशिराने उडाले. यासोबतच इतरही काही विमानांच्या उड्डाणांना उशीर झाला.नागपुरात धुके पसरले आहे. परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या मुंबईत धुक्याचा फार परिणाम नाही. असेही सांगण्यात आले आहे की, नागपूर-दिल्लीदरम्यान चालणाऱ्या काही एअरलाईन्स इतर शहरांसाठीही एका विमानाचा उपयोग करतात. दिल्लीमध्ये धुक्याचा सर्वाधिक परिणाम असल्याने उड्डाणांना उशीर होत असतो. दुसºया शहरांसाठी नंबर बदलवून फ्लाईट चालवले जाते. एका विमानाला उशीर झाला तर इतर विमानांनाही उशीर होतो.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरTrafficवाहतूक कोंडी