शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नासुप्र बरखास्तीच्या धास्तीने विकास कामांना ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 21:08 IST

शहरातील नासुप्रच्या अधिकार क्षेत्रात झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटप व विकास कामे हाती घेण्यात आलेली आहेत. मात्र नासुप्र बरखास्त होणार असल्याने गेल्या काही महिन्यांत विकास कामांना ‘बे्रक’ लागला आहे. याचा फटका शहरातील रस्त्यांच्या कामांनाही बसला आहे, अशी नाराजी आमदारांनी सोमवारी महापालिका व नासुप्रच्या संयुक्त बैठकीत व्यक्त केली.

ठळक मुद्देआमदारांनी व्यक्त केली नासुप्रविषयी नाराजी : झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटपाचे काम रखडले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील नासुप्रच्या अधिकार क्षेत्रात झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटप व विकास कामे हाती घेण्यात आलेली आहेत. मात्र नासुप्र बरखास्त होणार असल्याने गेल्या काही महिन्यांत विकास कामांना ‘बे्रक’ लागला आहे. याचा फटका शहरातील रस्त्यांच्या कामांनाही बसला आहे, अशी नाराजी आमदारांनी सोमवारी महापालिका व नासुप्रच्या संयुक्त बैठकीत व्यक्त केली.महापौर नंदा जिचकार, आमदार सुधाकर देशमुख, कृष्णा खोपडे, डॉ. मिलिंद माने, स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, नासुप्रचे विश्वस्त भूषण शिंगणे, आयुक्त अश्विन मुदगल, नासुप्रचे सभापती डॉ. दीपक म्हैसेकर, महापालिकेचे अपर आयुक्त रवींद्र कुंभारे, नासुप्रचे महाव्यवस्थापक अजय रामटेके, अधीक्षक अभियंता सुनील गुज्जलवार यांच्यासह पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. पट्टेवाटपासाठी सर्वेक्षणाचे काम खासगी एजन्सीला देण्यात आले आहे. मात्र यात दिरंगाई होत असल्याचे कृष्णा खोपडे यांनी निदर्शनास आणले. मिलिंद माने यांनीही नासुप्रच्या विकास कामांना ब्रेक लागल्याचे सांगितले. ज्या झोपडपट्ट्यांत सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे, अशा भागातील झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटप करण्यात यावे, अशी सूचना सुधाकर देशमुख यांनी दिली. नासुप्रच्या अधिकाऱ्यांनी पट्टेवाटपातील अडचणू दूर करून ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश महापौर व स्थायी समिती अध्यक्षांनी दिले.गेल्या अनेक वर्षांपासून झोपडपट्टीवासीयांना पट्टे वाटपाचे काम रखडले आहे. नासुप्रच्या अधिकार क्षेत्रातील झोपडपट्ट्यांचे सामाजिक-आर्थिक आणि प्लेन टेबल सर्वेक्षण करून पट्टेवाटपाची कार्यवाही तातडीने करा, असे निर्देश कुकरेजा यांनी दिले. नासुप्रच्या अधिकार क्षेत्रातील कामे व आरएलचे वाटप होणार नाही तोपर्यंत नासुप्र बरखास्त होणार नाही. त्यामुळे सर्वेक्षणासाठी नवीन एजन्सी नियुक्त करण्याची सूचना त्यांनी केली.२ आॅक्टोबरला पाच हजार घरांचे वाटपनागपूर शहरातील झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटप, गुंठेवारीअंतर्गत अभिन्यासाची व भूखंडांची प्रलंबित प्रकरणे याचा बैठकीत आढावा घेण्यात आला. सर्वेक्षण पूर्ण होताच दोन दिवसात पट्टेवाटप केले जाईल. आरएल वाटपाचे काम थांबलेले नाही. वर्षभरात २६ आरएल पत्राचे वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती दीपक म्हैसेकर यांनी दिली. तसेच पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पाच हजार घरांचे बांधकाम प्रगतीवर असल्याची माहिती त्यांनी दिली. २ आॅक्टोबरला या घरांचे वाटप होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Nagpur Improvement Trustनागपूर सुधार प्रन्यासnagpurनागपूर