शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

कर्जदार शेतकऱ्यांमुळे तरतेय ‘प्रधानमंत्री पीक विमा योजना’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 18:33 IST

पीक विम्याचा लाभच मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकाचा विमा उतरविण्याकडे पाठ फिरविली आहे. नागपूर विभागात केवळ ४९०८ हजार शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष विमा काढला आहे. पण कर्जदार शेतकऱ्यांना सक्तीने विमा काढावा लागत असल्याने, पीक विम्याचा आकडा फुगलेला दिसतो आहे. खऱ्या अर्थाने कर्जदार शेतकऱ्यांमुळे ‘प्रधानमंत्री पीक विमा योजना’ राबविणाऱ्या खासगी विमा कंपन्या तरल्या आहेत.

ठळक मुद्देविभागात केवळ ४९०० शेतकऱ्यांनी काढला प्रत्यक्ष पीक विमा

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पीक विम्याचा लाभच मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकाचा विमा उतरविण्याकडे पाठ फिरविली आहे. नागपूर विभागात केवळ ४९०८ हजार शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष विमा काढला आहे. पण कर्जदार शेतकऱ्यांना सक्तीने विमा काढावा लागत असल्याने, पीक विम्याचा आकडा फुगलेला दिसतो आहे. खऱ्या अर्थाने कर्जदार शेतकऱ्यांमुळे ‘प्रधानमंत्री पीक विमा योजना’ राबविणाऱ्या खासगी विमा कंपन्या तरल्या आहेत.गेल्यावर्षी पीक विम्याच्या नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांची थट्टाच झाली होती. १०० ते ५०० रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला होता. नागपूर जिल्ह्यातील एका तालुक्यात केवळ एकाच शेतकऱ्याला पीक विम्याचा लाभ मिळाला होता. गेल्यावर्षी नागपूर विभागात अडीच लाख शेतकऱ्यांपैकी केवळ ५४ हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता. त्यामुळे पीक विमा योजना फसवी असल्याची ओरड शेतकऱ्यांमधून होत होती. पीक विम्यावर विश्वासच नसल्याने नागपूर विभागात यावर्षी केवळ ४९०० शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष विमा उतरविला. परंतु शेतीसाठी बँकेचे कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा काढणे सक्तीचे केले आहे. त्याचा फायदा पीक विमा कंपन्यांना झाला आहे. नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यात कर्ज घेतलेल्या २,२२,७६२ शेतकऱ्यांना सक्तीने पीक विमा काढावा लागला आहे.

नागपूर विभागात कर्जदार शेतकऱ्यांनी काढलेला विमा

जिल्हा                  शेतकरी संख्यावर्धा                      ३६८१७नागपूर                 ४६,६१३भंडारा                 ६४,२११गोंदिया                ४१,६४७चंद्रपूर                 ४६,७४८गडचिरोली          २१,७६२ 

नागपूर विभागात बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी काढला विमा

जिल्हा               शेतकरी संख्यावर्धा                    ५०९नागपूर                १८६भंडारा                २१३गोंदिया               ९४चंद्रपूर                 ३२५२गडचिरोली          ६५४

शेतकरी वैयक्तिक विमा काढत नसेल तर, सहाजिकच आहे पीक विमा योजना ही फसवी आहे. तरी सरकार ही पॉलिसी राबवित आहे. कारण कंपन्यांना त्याच्यापासून फायदा मिळवून द्यायचा आहे. त्यासाठी कर्जदार शेतकऱ्यांना टार्गेट केले जात आहे. राम नेवले, शेतकरी नेते शेतकऱ्यांसाठी विमा खरोखरच लाईफलाईन आहे. परंतु त्यावर सरकारने नियंत्रण असायला हवे. सरकारने विम्याची जबाबदारी खाजगी कंपन्यांच्या हाती दिली आहे आणि कंपन्यांकडे झालेले नुकसान मोजण्याची कुठलीही यंत्रणा नाही. शिवाय नुकसानीनंतर अधिकाऱ्यांनी पाठविलेल्या अहवालाकडेही दूर्लक्ष केले जात असल्याने नुकसान होऊनही हजारो शेतकरी विम्यापासून वंचित राहत आहे. आज शेतकऱ्यांचा पीक विम्यावर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे वैयक्तिक विमा उतरविणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी झाली आहे. कंपन्यांना टिकविण्यासाठी सरकार कर्जदार शेतकऱ्यांना पीक विम्याची सक्ती करीत आहे.  श्रीधर ठाकरे, शेतीतज्ञ

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी