शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बुद्धाच्या धम्मामुळेच प्रगती शक्य  : ई.झेड. खोब्रागडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 23:02 IST

तथागत गौतम बुद्धांच्या धम्मामुळेच प्रगती शक्य आहे. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे आंबेडकरी समाज होय. बुद्धाचे विचार व धम्म अंगीकृत करून ते आपल्या जीवनात आचरणात आणल्यामुळेच या समाजाची ही प्रगती दिसून येते, असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी ई.झेड. खोब्रागडे यांनी केले.

ठळक मुद्देरमेश राठोड यांना पृथ्वीराज बनसोड सम्यक स्मृती पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : तथागत गौतम बुद्धांच्या धम्मामुळेच प्रगती शक्य आहे. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे आंबेडकरी समाज होय. बुद्धाचे विचार व धम्म अंगीकृत करून ते आपल्या जीवनात आचरणात आणल्यामुळेच या समाजाची ही प्रगती दिसून येते, असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी ई.झेड. खोब्रागडे यांनी केले.प्रा. पृथ्वीराज बनसोड प्रतिष्ठानतर्फे सोमवारी लष्करीबाग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिशन सभागृहात आयोजित प्रा. पृथ्वीराज बनसोड सम्यक स्मृती पुरस्कार अर्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. माजी आमदार उपेंद्र शेंडे अध्यक्षस्थानी होते. तर ज्येष्ठ साहित्यिक डॉ. प्रकाश खरात विशेष अतिथी होते.‘चलो बुद्ध की ओर’ अभियानांतर्गत ओबीसी तथा विमुक्त भटक्या बांधवांना बुद्ध धम्माच्या वाटेवर आणणाºया प्रा. डॉ. रमेश राठोड यांना ई.झेड. खोब्रागडे यांच्या हस्ते यंदाचा प्रा. पृथ्वीराज बनसोड सम्यक स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. १० हजार रुपये रोख, स्मृती चिन्ह, शाल व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप होते.ई.झेड. खोब्रागडे म्हणाले, समाजात प्रामाणिकपणे काम करणारे अनेक हिरो असतात पण ते नेहमीच पडद्यामागे असतात. रमेश राठोड हा असाच एक हिरो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न साकार करण्याचे अतिशय महत्त्वाचे काम ते करीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.डॉ. प्रकाश खरात यांनी आंबेडकरी चळवळीवर प्रकाश टाकला. या चळवळीला १०० वर्षे पूर्ण होत असून त्याचे मूल्यमापन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. उपेंद्र शेंडे यांनी आपल्या अध्यक्षी भाषणात प्रा. पृथ्वीराज बन्सोड यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.प्रास्ताविक भीमराव वैद्य यांनी केले. अ‍ॅ. महेंद्र बनसोड यांनी मानपत्राचे वाचन केले. संचालन प्रा. योगेश मुनेश्वर यांनी केले. कवी सूर्यभान शेंडे यांनी आभार मानले.‘चलो बुद्ध की ओर’ अभियानाला पुरस्काराची रक्कम प्रदानआपल्या सत्काराला उत्तर देताना प्रा. रमेश राठोड म्हणाले, बुद्धाचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मार्ग हा कोणत्याही धर्माला व देशाला प्रगतीपथावर नेणारा आहे. यावेळी त्यांना पुरस्कार स्वरूप मिळालेली १० हजार रुपयाची रक्कम त्यांनी ‘चलो बुद्ध की ओर’ या अभियानासाठी प्रदान केली.

टॅग्स :nagpurनागपूरcultureसांस्कृतिक