लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाचपावलीतील राणी दुर्गावती चौक येथून दिवसाढवळ्या एका युवतीचे अपहरण करण्यात आल्यामुळे खळबळ माजली आहे. ही घटना मंगळवारी घडली.एका २१ वर्षीय युवतीने नांदेड येथील युवकासोबत प्रेमविवाह केला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे आपसात पटत नव्हते. त्यामुळे युवती माहेरी गेली होती. तिने पतीकडे परत जाण्यास नकार दिला होता. परिणामी, पतीने अनेकदा सासरी जाऊन वाद घातला होता. युवती मंगळवारी सकाळी ९ च्या सुमारास ९ वर्षाच्या लहान भावासोबत दुचाकीने राणी दुर्गावती चौकातील पेट्रोल पंपावर गेली होती. तेथे तीन युवक कारने आले. त्यापैकी एकाने युवतीला बळजबरीने कारमध्ये बसवले. त्यानंतर ते युवतीला सोबत घेऊन गेले. युवतीच्या भावाने घरी जाऊन वडिलांना घटनेची माहिती दिली. वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. तसेच, पेट्रोल पंपावरूनही पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली होती. पाचपावली पोलीस पेट्रोल पंपावर गेले. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावरून पोलिसांनी कारचा शोध घेतला. दरम्यान, कार चालक व त्याच्या साथीदाराने युवती तिच्या पतीसोबत गेल्याची माहिती दिली. कारमध्ये युवतीच्या पतीचा मित्र हर्ष बसला होता. हर्षने अपहरणाचा आरोप फेटाळून युवती तिच्या पतीसोबत प्रतापनगरातील भरोसा सेलमध्ये गेल्याचे सांगितले. युवतीच्या पतीने हर्षकडून त्याला कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने साडेचार हजार रुपये घेतले आहेत. तो तीन दिवसांपूर्वी हर्षच्या घरी गेला होता. युवतीच्या पतीने अशाप्रकारे अनेकांना फसविल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. रात्री उशिरापर्यंत युवती मिळाली नसल्यामुळे ती पतीसोबत नागपूरबाहेर गेल्याचा संशय बळावला आहे.
युवतीच्या अपहरणामुळे नागपुरातील पाचपावलीत खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 00:56 IST
पाचपावलीतील राणी दुर्गावती चौक येथून दिवसाढवळ्या एका युवतीचे अपहरण करण्यात आल्यामुळे खळबळ माजली आहे. ही घटना मंगळवारी घडली.
युवतीच्या अपहरणामुळे नागपुरातील पाचपावलीत खळबळ
ठळक मुद्देपोलिसांचा तपास सुरू : पतीने कट रचल्याचा संशय