शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

दारुच्या नशेत वाद, मित्रांनी केली गुंडाची हत्या टेलिफोन एक्स्चेंज चौकात थरार

By योगेश पांडे | Updated: November 24, 2023 23:19 IST

योगेश पांडे  नागपूर : दारुच्या नशेत वाद झाल्यानंतर सोबतच बसलेल्या एका तरुणाची त्याच्याच मित्रांनी तलवारीची वार करत हत्या केली. ...

योगेश पांडे नागपूर : दारुच्या नशेत वाद झाल्यानंतर सोबतच बसलेल्या एका तरुणाची त्याच्याच मित्रांनी तलवारीची वार करत हत्या केली. मृतक व आरोपी दोघेही गुन्हेगारी प्रवृत्तीचेच असून या घटनेमुळे टेलिफोन एक्स्चेंज चौकाजवळ खळबळ उडाली होती. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली.विजय पन्नालाल चव्हाण (३५, नंदनवन झोपडपट्टी) असे मृतकाचे नाव आहे. तो त्याचे मित्र विजय उर्फ भैरव दिलीप डायरे (३६, वाठोडा) व रुपेश रामराव मून (३२, जयभीम चौक) यांच्यासोबत टेलिफोन एक्स्चेंज चौकातील आगलावे दारू भट्टीजवळ बसला होता.

तिघांनीही दारू ढोसली व नशेत ते बरळायला लागले. काही वेळातच त्यांच्यात वाद सुरू झाला. भांडण वाढले आणि काही कळायच्या आतच भैरव व रुपेशने विजयवर तलवारीसदृश शस्त्राने वार केले. त्यात विजय रक्तबंबाळ झाला. घटनास्थळावर यामुळे खळबळ उडाली व दोन्ही आरोपी फरार झाले. घटनास्थळावरील लोकांनी पोलिसांना याची माहिती दिली.

लकडगंज पोलीस ठाण्याचे पथक तेथे पोहोचले. विजयचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात नेमका प्रकार लक्षात आला. पोलिसांनी खबऱ्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून आरोपींच्या घराचे पत्ते शोधले. वैभव डायरेला रात्री अटक करण्यात आली तर रुपेश फरार आहे. रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी व मृतक हे गुन्हेगारी प्रवृत्तीचेच होते. भैरव हा बराच काळ तुरुंगात होता व काही दिवसांअगोदरच परतला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस