शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात मद्यधुंद झायलोचालकाने घेतला पोलिसाचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 23:36 IST

मद्यधुंद झायलोचालकाने जोरदार धडक दिल्यामुळे कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस शिपायाचा करुण अंत झाला. तर दुसरा पोलीस शिपायी गंभीर जखमी आहे. वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी मध्यरात्री हा भीषण अपघात घडला.

ठळक मुद्देबीट मार्शल प्रदीप उईके ठार, अजय पाटील जखमीअमरावती मार्गावर वाडीत झाला अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मद्यधुंद झायलोचालकाने जोरदार धडक दिल्यामुळे कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस शिपायाचा करुण अंत झाला. तर दुसरा पोलीस शिपायी गंभीर जखमी आहे. वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी मध्यरात्री हा भीषण अपघात घडला.प्रदीप गणपतराव उईके (वय ३४) असे मृताचे तर अजय प्रभाकर पाटील (वय ४२) असे जखमी पोलिसाचे नाव आहे. हे दोघे वाडी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. रविवारी त्यांची नाईट ड्युटी होती. रात्री १२.३० च्या सुमारास ते कर्तव्यावर होते. दुचाकीने प्रदीप आणि अजय आठवा मैलकडे गस्त करीत असताना मागून वेगात आलेल्या झायलो (एमएच ३१/ सीएस १८५३) चा आरोपी चालक हर्षदीपसिंग देवेंद्रसिंग आनंद (वय ३६, रा. शिवाजीनगर, हर्षविला, अंबाझरी) याने प्रदीप व अजयच्या दुचाकीला जोरदार धडक मारली. त्यामुळे खाली पडून दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना डॉक्टरकडे नेले असता डॉक्टरांनी प्रदीप उईके यांना मृत घोषित केले.आरोपी होता टून्नकर्तव्यावरील पोलिसाचा बळी घेणारा आरोपी हर्षदीपसिंग आनंद हा दारूच्या नशेत टून्न होता. तो तशाही अवस्थेत बेदरकारपणे कार चालवित होता. त्याचमुळे हा अपघात घडला. दरम्यान, माहिती कळताच वाडी पोलिसांचा ताफा तसेच रात्रपाळीवरील पोलीस अधिकारी अपघातस्थळी तसेच रुग्णालयात पोहचले. आरोपी वाहनचालकाला अटक करण्यात आली असून, या अपघातामुळे पोलीस दलात तीव्र शोककळा पसरली आहे.

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिस