शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

ड्रग्ज तस्करांना झटका, २४ तासांत ५.२० लाखांची एमडी जप्त

By योगेश पांडे | Updated: May 8, 2024 17:26 IST

Nagpur : दुचाकीवरून तस्करी करणाऱ्या आणखी एका आरोपीला अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरात एमडी तस्करीचे प्रमाण वाढले असून पोलिसांकडून कारवायादेखील वाढल्या आहे. २४ तासांत शहरात दोन ठिकाणी कारवाया करत पोलिसांनी तस्करांकडून ५.२० लाखांची एमडी पावडर जप्त केली. सक्करदरा व जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेच्या पथकांनी या कारवाया केल्या.

बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधात पथकाला जुना बिडीपेठ परिसरात एक दुचाकीस्वार एमडी पावडर घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून ईकबाल शेख तय्यब शेख (४०, जुना बिडीपेठ) याला ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात एनडीपीएस ॲक्टअंतर्गत अगोदरदेखील तीन गुन्हे दाखल झाल्याने त्याची कसून झडती घेण्यात आली. त्याच्या ताब्यातून ५०.८१ ग्रॅम एमडी पावडर आढळली. तिची किंमत ५.०८ लाख रुपये इतकी होती. त्याच्या ताब्यातून पावडर व दुचाकी जप्त करण्यात आली. त्याची चौकशी केली असता त्याने ईस्तियाक खादीम (मोठा ताजबाग) व वसीम उर्फ गुड्डू (मोठा ताजबाग) यांच्या मदतीने एमडी पावडर मिळविल्याचे सांगितले. तीनही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईकबालला सक्करदरा पोलीस ठाण्यातील पथकाच्या हवाली करण्यात आले. पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने, सिध्दार्थ पाटील, मनोज नेवारे, नितीन साळुंखे, रोहीत काळे, सुभाष गजभिये व अनुप यादव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

- दुचाकीवरून तस्करी करणाऱ्या आणखी एका आरोपीला अटकदरम्यान मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक एकचे पथक गस्तीवर असताना खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे इंदोरा चौकात सापळा रचण्यात आला. दुचाकीवरून आलेल्या सुधीर उर्फ चॅपल विलास गजभिये (३०, मायानगर, इंदोरा) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याजवळ १.३६ ग्रॅम एमडी पावडर आढळली. पोलिसांनी पावडर, दुचाकी, मोबाईल जप्त केले. त्याच्याविरोधात जरीपटका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :Drugsअमली पदार्थnagpurनागपूर