शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
8
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
9
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
10
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
11
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
12
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
13
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
14
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
15
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
16
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
17
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
18
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
20
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की

औषधे उत्पादक राज्य सोडण्याच्या तयारीत

By admin | Updated: June 11, 2014 01:25 IST

राज्याचे अन्न व औषध प्रशासन (एफडीए) स्वत:च केंद्राच्या नियमांचे उल्लंघन करीत पार्सल पोस्टाद्वारे औषधे निर्यात करणाऱ्यांवर औषध व सौंदर्य प्रसाधन कायद्याचे उल्लंघन

आयपीडीए : औषध निर्यातीवरील बंदीने व्यापारी संकटात नागपूर : राज्याचे अन्न व औषध प्रशासन (एफडीए) स्वत:च केंद्राच्या नियमांचे उल्लंघन करीत पार्सल पोस्टाद्वारे औषधे निर्यात करणाऱ्यांवर औषध व सौंदर्य प्रसाधन कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत आहे. यामुळे मागील चार महिन्यांपासून कोट्यवधी रुपयांची औषधे निर्यात ठप्प पडली आहे. याचा परिणाम औषधे उत्पादक कंपन्यांवरही पडला आहे. काही कंपन्या महाराष्ट्र सोडून गुजरातमध्ये जाण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती भारतीय औषधे डीलर असोसिएशनचे (आयपीडीए) सचिव नवनीत वर्मा यांनी पत्रकारांना दिली.वर्मा यांनी सांगितले की, देशाच्या बाहेर कोणत्याही प्रकारच्या निर्यातीसाठी केंद्र शासनाचे नियम लागू होतात. परंतु महाराष्ट्र एफडीएने फेब्रुवारी २०१४ पासून पार्सल पोस्टच्या माध्यमातून औषधांच्या ई-निर्यातीवर प्रतिबंध लावला आहे. निर्यातीसाठी प्रीस्क्रिप्शनची मागणी केली जात आहे. जेव्हा की विदेशांमध्ये औषधे थर्ड पार्टीच्या माध्यमातून पाठविली जातात. कुठेच औषधांचा दुरुपयोग किंवा अवैध व्यवसाय होत नाही. औषधांच्या एकूण ई-निर्यातीमध्ये महाराष्ट्राची भागीदारी ८० टक्के आहे. छोटे व मध्यम उद्योगांमध्ये ओळख असलेल्या औषधी कंपन्या हे निर्यात करतात. यातून राज्याला कोट्यवधीचा महसूल प्राप्त होतो. तरीही औषधे व सौंदर्य प्रसाधन कायदा १९४० चा गैरवापर आणि चुकीच्या अंमलबजावणीचा वापर याचा ठपका एफडीएने निर्यातदारांवर ठेवला आहे. एकीकडे केंद्र सरकार ई-निर्यातीला प्रोत्साहन देत असताना राज्याचे एफडीए औषधे उत्पादकांनाच राज्याच्या बाहेर पाठविण्यावर दबाव आणत आहे. यात लाखो लोक बेरोजगार होण्याची शक्यता आहे. आयपीडीएचे अध्यक्ष सुनील फाळके यांनी सांगितले की, मोठ्या औषध कंपन्यांच्या इशाऱ्यामुळेच निर्यातीवर प्रतिबंध लावण्यात आला आहे. याला तत्काळ हटविणे आवश्यक आहे. असे न झाल्यास औषधे उत्पादक आणि निर्यातदार दुसऱ्या राज्यात जाण्याचा धोका आहे. याची माहिती आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांनाही दिली आहे. (प्रतिनिधी)