शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

जीवघेण्या 'ब्रेन ट्युमर'ला भेदणार औषधीयुक्त 'नॅनो पार्टिकल्स'

By आनंद डेकाटे | Updated: April 5, 2025 17:07 IST

नाकाद्वारे थेट मेंदूतील गाठीपर्यंत पोहोचेल औषध : विद्यापीठाच्या औषधी निर्माणशास्त्र विभागातील संशोधकांनी शोधली उपचाराची नवीन पद्धत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नाकाद्वारे दिलेले औषध थेट मेंदूतील गाठीपर्यंत पोहोचत औषधीयुक्त 'नॅनो पार्टिकल्स' आता जीवघेण्या 'ब्रेन ट्युमर'ला भेदणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या औषधी निर्माणशास्त्र विभागातील संशोधकांनी कॅन्सर या जीवघेण्या आजारावर कोठेही शक्य होईल, अशी उपचाराची नवीन पद्धत शोधून काढली आहे. उपचाराच्या नवीन पद्धतीमुळे कॅन्सरने ग्रस्त असलेल्या अनेक रुग्णांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

औषधी निर्माणशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. विणा शैलेंद्र बेलगमवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सागर त्रिवेदी यांनी केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झालेल्या 'इन्स्पायर फेलोशिप'मधून अत्यंत उपयोगी असलेले हे नाविन्यपूर्ण संशोधन केले आहे. प्रचलित उपचार पद्धतीनुसार कॅन्सर रुग्णांना किमोथेरपी शिवाय पर्याय नाही. किमोथेरपीद्वारे औषधी रुग्णांना रक्तभिसरणाच्या माध्यमातून दिली जाते. या प्रचलित थेरपीमुळे रुग्णांच्या इतर अवयवावर विपरीत परिणाम होण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे संशोधकांनी रक्ताला टाळत न्यूरान्सच्या माध्यमातून थेट मेंदूमध्ये औषध पोहोचेल अशी उपचाराची नवीन पद्धत संशोधनातून शोधून काढली आहे. 'नोवेल टार्गेटेड ड्रग डिलिव्हरी सिस्टीम' असे या नवीन प्रकारच्या उपचार पद्धतीला नाव देण्यात आले आहे.

अशी आहे उपचार पद्धतस्प्रेद्वारे नाकावाटे औषधीतील नॅनो पार्टिकल्स न्यूरान्सच्या माध्यमातून थेट मेंदूतील गाठीपर्यंत पोहोचेल. या नवीन उपचार पद्धतीत औषधी मेंदूतील गाठींपर्यंत पोहोचत असताना रक्ताचा अडथळा होणार नाही, याची दक्षता देखील घेण्यात आली आहे. शरीराच्या इतर भागापर्यंत औषध पोहोचणार नसल्याने अन्य अवयवांना इजा पोहोचण्याची शक्यता कमी होणार आहे. नवीन पद्धत ग्लायो ब्लास्टोमा मल्टीमार्म (जीबीएम)- ग्रेड ४ मधील ब्रेन ट्युमर झालेल्या रुग्णांवर देखील नवीन औषधोपचार पद्धत वापरता येणार आहे. अनेकदा रुग्णांना केमोथेरेपी अथवा प्रचलित पद्धतीनुसार औषधोपचार करण्यासाठी रुग्णालयात भरती व्हावे लागते. या नवीन पद्धतीनुसार रुग्णालयात अथवा कोठेही स्प्रेच्या माध्यमातून वैद्यकीय मार्गदर्शनाखाली औषधोपचार घेणे सुलभ होणार आहे. त्यामुळे रुग्णांचा वेळ तसेच पैशाची बचत देखील होणार आहे.

संशोधनासाठी दोन पेटंट'ब्रेन ट्युमर'वरील आजारासाठी शोधून काढलेल्या 'नोवेल टार्गेटेड ड्रग डिलिव्हरी सिस्टीम' या नवीन प्रकारच्या उपचार पद्धतीसाठी औषधी निर्माणशास्त्र विभागातील डॉ. विणा बेलगमवार व डॉ. सागर त्रिवेदी यांना दोन पेटंट प्राप्त झाले आहे. या उपचार पद्धतीबाबत डॉ. सागर त्रिवेदी यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे १२ संशोधन पेपर तर ५ बुक चाप्टर प्रसिद्ध झाले आहे.

इटली येथे प्रेझेंटेशनभारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या वतीने प्राप्त झालेल्या एसईआरबीमधून डॉ. सागर त्रिवेदी यांनी इटली येथील बोलोनिया येथे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत या संशोधनाबाबत प्रेझेंटेशन सादर केले आहे.

टॅग्स :nagpurनागपूर