शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर ग्रामीण तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 12:40 IST

Nagpur News नागपूर ग्रामीण तालुका वगळता इतर सर्वच तालुक्यातील गावांची सुधारित पैसेवारी ५० पेक्षा जास्त दर्शविण्यात आली. 

ठळक मुद्दे१४९ गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पूर, अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे प्रचंड नुकसान झाले. असे असताना दुसरीकडे जिल्हातील पीक परिस्थिती उत्तम दाखविण्यात आली आहे. नागपूर ग्रामीण तालुका वगळता इतर सर्वच तालुक्यातील गावांची सुधारित पैसेवारी ५० पेक्षा जास्त दर्शविण्यात आली. पीक परिस्थितीची माहिती करण्याकरिता पैसेवारीचा आधार घेण्यात येतो. तीनदा ही पैसेवारी जाहीर करण्यात येते. नजरअंदाज पैसेवारीनंतर आता सुधारित पैसेवारी जाहीर करण्यात आली. यानुसार जिल्ह्यातील फक्त नागपूर ग्रामीण तालुक्यात पीक परिस्थिती चांगली नाही. येथील १४८ गावांमधील पैसेवारी ५० पेक्षा कमी दर्शविण्यात आली, तर काटोल तालुक्यातील फक्त एका गावाची पैसेवारी ५० पेक्षा कमी जाहीर करण्यात आली. जिल्ह्यात १,८४४ गावांमध्ये खरीपाचे पीक घेण्यात येते. यातील १,७८९ गावांची पैसेवारी जाहीर करण्यात आली, तर १६४ गावांची पैसेवारी जाहीर करण्यात आली नाही.

सर्वाधिक नुकसान झालेल्या तालुक्यातील एकही गाव नाही विशेष म्हणजे जिल्ह्यात तीनवेळा अतिवृष्टी झाली असून पूर परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे शेतपिकांनी मोठ्या प्रमाणात फटका बसला. सर्वाधिक फटका रामटेक, पारशिवनी, मौदा, उमरेड आणि भिवापूर या पाच तालुक्यांना बसला. स्वतः शासन, प्रशासनाने ही बाब मान्य केली. नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्राचे पथक येऊन गेले. त्यांनीही नुकसान मान्य केले. शासनानेही नुकसानीकरिता मदत जाहीर केली आहे. परंतु पैसेवारी निश्चित करताना गावांची पीकस्थिती उत्तम दर्शविल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

टॅग्स :droughtदुष्काळ