आॅनलाईन लोकमतनागपूर बसचे चालक -वाहक सिग्नलवर बस उभी असताना खर्रा वा पान थुंकतात. यासंदर्भात साक्ष मिळाल्यास संबंधितांना निलंबित क रण्यात येईल. त्यामुळे चालक-वाहकांनी गाडी चालविताना पान , खर्रा खाऊ नये, असे आवाहन बंटी कुकडे यांनी केले आहे. विद्यार्थिनी व महिलांच्या सुरक्षेचा विचार करता राज्य सरकारच्या निर्देशानुसार महापालिका महिलांसाठी लवकरच विशेष बस सुरू करणार आहे. यासाठी ३२ सिटर बसची निवड करण्यात आली आहे. शनिवारी परिवहन समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांच्यासह प्रवीण भिसीकर, नितीन साठवणे, उज्ज्वला शर्मा, वैशाली रोहणकर, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप आदी उपस्थित होते. महिलांसाठी विशेष बस सेवा सुरू करण्यासाठी शासनाकडून ९.२५ कोटींचा निधी मजूर झाला आहे. जानेवारी महिन्यात स्वच्छतेचा सर्वे होणार आहे. जनजागृतीसाठी आपली बसेसवर स्टीकर लावण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न सुरू आहे. बस स्वच्छ ठेवणाऱ्या चालक-वाहकांना स्वच्छता दूत पुरस्कार देण्यात येईल, अशी माहिती बंटी कुकडे यांनी दिली.
नागपुरातील परिवहन मंडळाचे चालक-वाहक बस चालवताना थुंकल्यास त्यांचे निलंबन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 10:17 IST
बसचे चालक -वाहक सिग्नलवर बस उभी असताना खर्रा वा पान थुंकतात. यासंदर्भात साक्ष मिळाल्यास संबंधितांना निलंबित क रण्यात येईल.
नागपुरातील परिवहन मंडळाचे चालक-वाहक बस चालवताना थुंकल्यास त्यांचे निलंबन
ठळक मुद्देपुन्हा धावणार महिलांसाठी विशेष बस