शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

थरार! चालकाने ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबला अन् कार दोघांच्या अंगावरुन गेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2021 17:24 IST

पार्किंगमधील ही कार रिव्हर्स करण्याचा प्रयत्न करताना चालकाने ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबल्याने क्षणार्धात कार जोरदार वेगाने रिव्हर्स आली व थेट दोन तरुणांच्या अंगावरुन गेली.

नागपूर : कार रिव्हर्स घेताना चालकाच्या निष्काळजीपणामुळे कार जोरदार वेगाने रिव्हर्समध्ये येत दोन तरुणांच्या अंगावरून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा सर्व प्रकार त्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

ही घटना सावनेर तालुक्यातील मुख्य रस्त्यावर घडली असून कारचालकाच्या एका चुकीमुळे दोन तरुण गंभीररित्या जखमी झाले. मेन रोडच्या जवळ पांढऱ्या रंगाची ही कार पार्क करण्यात आली होती. ती काढण्याचा प्रयत्न करताना चालकाने ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबला व क्षणार्धात कार जोरदार वेगाने मागे आली.

यावेळी, बाजुलाच असलेल्या एका बाकडयावर तीन तरुण बसले होते. अचानक कार रिव्हर्समध्ये वेगाने आपल्या दिशेने येत असल्याचं पाहून एक तरुण लगेच उठला तर, इतर दोघांना काही कळण्याआधीच कार त्यांच्या अंगावरून गेली. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे.

माहितीनुसार, कारचालक हा दारूच्या नशेत तुल असल्याने त्याच्याकडून हे कृत्य झाल्याचे म्हटले जात आहे. तर, अचानक झालेल्या या प्रकाराने एकच गोंधळ माजला. दरम्यान, या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. 

टॅग्स :AccidentअपघातcarकारCrime Newsगुन्हेगारी