शहरं
Join us  
Trending Stories
1
'पीएम मोदी गोष्टी लपवतात; ट्रम्प त्या उघड करतात', रशियन तेल खरेदीवरुन काँग्रेसचे टीकास्त्र
2
कोट्यवधींचं घबाड! १ कोटी कॅश, लाखोंचे दागिने, ८५ ATM; चहावाल्याचा पर्दाफाश, पोलीस हैराण
3
फ्लॅटमध्ये लिव्ह-इनमध्ये राहत होतं जोडपं, दिवाळीच्या दिवशी दुर्गंधी आल्यानं उघडला तर...; दृश्य पाहून सगळेच हादरले
4
भारताच्या 'या' स्कीममुळे शेजारी चीनला लागली मिरची; तक्रार घेऊन पोहोचला WTO च्या दरबारी
5
बदल्याची आग! "माझ्यासोबत तुझी बहीण पळून..."; टोमण्यांना कंटाळला, घेतला तरुणाचा जीव
6
VIRAL VIDEO : महिलेच्या केसांत अडकला हेअर कर्लर अन् पुढे जे झालं ते बघून तुम्हीही व्हाल हैराण!
7
महिला वर्ल्डकपमध्ये आता सेमीफायनलच्या एका जागेसाठी ३ संघांमध्ये चुरस, भारतासाठी असं आहे समीकरण
8
"सांसें उधार हैं... दिल तो महाकाल का है"; भस्म आरतीआधी भक्ताला हार्ट अटॅक, स्टेटसची चर्चा
9
जो जीव तोडून मेहनत घेतोय त्याला BCCI नं येड्यात काढलं? मुंबईकरासाठी बड्या राजकीय नेत्याची बॅटिंग
10
सलग ८८ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ₹१ लाखाचे झाले ₹२,६०,०००; तुमच्याकडे आहे का हा स्टॉक?
11
७ राशींवर कायम लक्ष्मी-कुबेर कृपा, पैसे कमीच पडत नाही; शुभ तेच घडते, तुमची रास आहे का यात?
12
समोश्यावरून वाद सुरू झाला अन् तलवारीच बाहेर निघाल्या! शेतकऱ्याच्या मृत्यूने परिसर हादरला
13
"समजलं तर ठीक, नाही तर...!", कॅनाडामध्ये पंजाबी सिंगर तेजी कहलोंवर गोळीबार; रोहित गोदारा गँगनं घेतली जबाबदारी
14
चित्रांगदा सिंह रुग्णालयात दाखल, ऐन दिवाळीत अभिनेत्रीची तब्येत बिघडली; नक्की झालं तरी काय?
15
प्रायव्हसी धोक्यात? 'Apple Maps' गुपचूप ट्रॅक करतंय तुमची प्रत्येक लोकेशन! लगेच बंद करा 'ही' सेटिंग
16
IND vs AUS : 'मी सचिनपेक्षाही अधिक धावा केल्या असत्या!' पण… ऑस्ट्रेलियन क्रिकेटरचा मोठा दावा
17
Happy Bhaubeej 2025 Wishes: भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Whatsapp Status द्वारा द्या प्रेमळ नात्याच्या लडिवाळ शुभेच्छा!
18
लेडी सिंघम! १४ व्या वर्षी लग्न, १८ व्या वर्षी २ मुलांची आई; स्वप्न केलं साकार, झाली IPS ऑफिसर
19
PPF vs FD: पीपीएफ की एफडी, कुठे गुंतवणूक केल्यावर मिळेल मोठा फायदा? कोणता पर्याय करुन देऊ शकते तुफान कमाई
20
Ladki Bahin Yojana : खूशखबर! भाऊबीजेआधी लाडक्या बहि‍णींसाठी खास ओवाळणी; ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार?

नागपुरात  नादुरुस्त ट्रकचा चालक राहिला दोन दिवस उपाशी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 23:47 IST

आंध्र प्रदेशातून माल घेऊन नागपुरात पोहचलेला मालवाहू ट्रक रेडिसन चौकात मंगळवारी बंद पडला. या अनोळखी शहरात सारेच बंद असल्याने भुकेने व्याकूळ झालेला ट्रकचालक ढसाढसा रडला.

ठळक मुद्देपोलिसाने केली मदत : संकट पाहून रडला ढसाढसा ट्रकचालक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आंध्र प्रदेशातून माल घेऊन नागपुरात पोहचलेला मालवाहू ट्रक रेडिसन चौकात मंगळवारी बंद पडला. या अनोळखी शहरात सारेच बंद असल्याने भुकेने व्याकूळ झालेला ट्रकचालक ढसाढसा रडला. अखेर पोलीस मदतीला धावले. बिस्किटे देऊन दिलासा दिलासा दिला.गणेश पर्ताळे असे या ट्रकचालकाचे नाव असून त्याच्यासोबत बाबासाहेब सोनकांबळे नावाचा क्लीनर आहे. हे दोघेही नांदेड येथे राहणारे आहेत. एमएच २६, एडी -२२४८ क्रमांकाच्या ट्रकमध्ये येथील व्यापाऱ्याचा माल घेऊन ते आंध्रप्रदेशातून दोन दिवसांपूर्वी निघाले. नागपुरात पोहचल्यावर सोमवारी रात्री रेडिसन्स चौकात ट्रक बंद पडला. शहर अनोळखी. त्यातल्या त्यात संचारबंदीमुळे सर्व व्यवहार बंद पडलेले. अशा अवस्थेत त्यांनी रात्र काढली. मंगळवारी काहीतरी मार्ग निघेल म्हणून वाट पाहिली. मात्र कोणतीही मदत मिळाली नाही. उपाशीपोटी असलेल्या या दोघांचाही जीव कासावीस झाला. संचारबंदीमुळे चौकात वाहतूक पोलिसाच्या ड्यूटी लागली आहे. गुणवंता देवतळे या वाहतूक शिपायाच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी आपल्या जवळची बिस्किटे त्यांना दिली. पाणीही दिले. या बिस्किटावर त्यांनी रात्र काढली. यातच बुधवार उगवला. आता आपले काही खरे नाही, याची जाणीव झाल्याने धीर सोडलेला ट्रकचालक ढसाढसा रडला. बुधवारी नागपुरातील संबंधित व्यापाऱ्यासोबत संपर्क झाला. त्याने ताजबागमध्ये राहणाºया रशिद खान नावाच्या आपल्या कामगाराच्या माध्यमातून बुधवारी दुपारी टिफीन पुरविण्याची व्यवस्था केली. मात्र या कामगाराला मार्गात पोलिसांनी अडवले. त्यातून कसाबसा मार्ग काढत त्याने टिफीन पोहचविला. दोन दिवसांनंतर या दोघांना बुधवारी दुपारी अन्न मिळाले. या मदतीमुळे बुधवारची सोय झाली असली तर समस्या मात्र कायमच आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर