पिण्याच्या पाण्याची शेतात नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:09 AM2021-04-12T04:09:03+5:302021-04-12T04:09:03+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : मनसर-तुमसर मार्गाच्या कामात कंत्राटदार कंपनीने या राेडलगत आलेली शीतलवाडी-परसाेडा गावाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फाेडली. ...

Drinking water wasted in the field | पिण्याच्या पाण्याची शेतात नासाडी

पिण्याच्या पाण्याची शेतात नासाडी

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : मनसर-तुमसर मार्गाच्या कामात कंत्राटदार कंपनीने या राेडलगत आलेली शीतलवाडी-परसाेडा गावाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फाेडली. ही पाईपलाईन महिनाभरापासून दुरुस्त न केल्याने लगतच्या शेतात व नाल्यात पाणी वाहून जात असल्याने राेज शेकडाे लिटर पाण्याची नासाडी हाेत आहे. आधीच पाण्याचे दुर्भिक्ष असताना या गंभीर प्रकाराकडे लक्ष देण्यात कंत्राटदार कंपनीकडे वेळ नाही.

मनसर (ता. रामटेक)-तुमसर (जिल्हा भंडारा) या मार्गाच्या चाैपदरीकरणाच्या कामाचे कंत्राट बारब्रिक कंपनीला दिले आहे. शीतलवाडी-परसाेडा गावाला रामटेक शहरालगतच्या खिंडसी जलाशयातून पाणीपुरवठा केला जात असून, पाणीपुरवठ्याची पाईपलाईन या राेडलगत टाकली आहे. या राेडच्या कामात कंत्राटदार कंपनीने ही पाईपलाईन अनेकदा फाेडली आहे. त्यातच कंपनीच्या कामगारांनी काम करताना ही पाईपलाईन महिनाभरापूर्वी पुन्हा फाेडली. ती तातडीने दुरुस्त करण्यात यावी, यासाठी कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना वारंवार सांगण्यात आले. मात्र, कुणीही याकडे लक्ष दिले नाही, असा आराेप सरपंच मदन सावरकर व उपसरपंच विनाेद सावरकर यांनी केला आहे.

ही पाईपलाईन दुरुस्त करण्यासाठी कंत्राटदार कंपनी वेळकाढू धाेरण अवलंबत असल्याने राेज शेकडाे लिटर पाणी शेतात व नाल्यात वाहून जात आहे. गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या लक्षात घेता कंपनीने ही पाईपलाईन तातडीने दुरुस्त करून द्यावी, अशी मागणी सरपंच मदन सावरकर, उपसरपंच विनाेद सावरकर यांच्यासह नागरिकांनी केली असून, कंपनीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

Web Title: Drinking water wasted in the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.