शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

नागपुरच्या इतवारीतील सुपारी व्यापाऱ्यावर ‘डीआरआय’ची धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 23:06 IST

इतवारी येथील एका सुपारी व्यापाऱ्याच्या कार्यालयावर गुरुवारी डायरेक्टोरेट आॅफ रेव्हेन्यू इंटेलिजेंस (डीआरआय) ने धाड टाकली. सुपारी व्यापारी हा भाजपाचा पदाधिकारी असल्याने या कारवाईमुळे इतवारीतील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देसडक्या सुपारीचे आसाम ते नागपूर कनेक्शन : व्यापाऱ्यांमध्ये खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इतवारी येथील एका सुपारी व्यापाऱ्याच्या कार्यालयावर गुरुवारी डायरेक्टोरेट आॅफ रेव्हेन्यू इंटेलिजेंस (डीआरआय) ने धाड टाकली. सुपारी व्यापारी हा भाजपाचा पदाधिकारी असल्याने या कारवाईमुळे इतवारीतील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.इतवारी मस्कासाथ येथील मेमन जमान बिल्डिंग मध्ये आसिफ कलीवाला यांचे जे.के. ट्रेडर्स आहे. कलीवाला हे सुपारीचे मोठे व्यापारी आहेत. सूत्रानुसार डीआरआयच्या पथकाने दुपारी ३ वाजता कलीवाला यांच्या कार्यालयात धाड टाकली. कार्यालयाची तपासणी करून उपस्थित लोकांची विचारपूस केली. रात्री ९ वाजेपर्यंत ही विचारपूस सुरू होती. त्यानंतर पथक परतले.सूत्रानुसार सहा महिन्यांपूर्वी डीआरआयने मुंबईत इर्शाद नावाच्या एका सुपारी व्यापाऱ्यास पकडले होते. इर्शाद हा आसाम सीमेवरून सडलेली सुपारी लपवून आणत होता. तो दरदिवशी कोट्यवधी रुपयाची प्रतिबंधित विषारी सुपारी नागपूरला पाठवत होता. इतवारीतील अनेक सुपारी व्यापारी त्याच्याशी जुळलेले होते. डीआरआयने त्याची विचारपूस केली तेव्हा त्याच्याशी संबंधित व्यापाऱ्यांचे नाव समोर आले. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जाते. कलीवाला हे भाजपाचे पदाधिकारी सुद्धा आहे. त्यामुळे या कारवाईची बरीच चर्चा होत आहे. इतवारीतील अनेक व्यापारी सडलेल्या सुपारीचा व्यवसाय करतात. शासकीय कार्यालयांमध्ये त्यांची चांगली चलती आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाई होत नाही.इर्शादच्या अटकेला सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. परंतु इतक्या उशिरा कारवाई झाल्याने वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहे. या कारवाईमुळे अनेक सुपारी व्यापाऱ्यांचे चेहरे पडले आहेत. आपल्यावरही कारवाई होऊ शकते, अशी त्यांना भीती आहे. डीआरआयने या प्रकरणाची कसून चौकशी केल्यास अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस येण्याची शक्यता आहे. या प्रकरणाशी संबंधित सुपारी व्यापाऱ्यांनी नुकतीच कोट्यवधी रुपयांची जमीनसुद्धा खरेदी केली आहे.

टॅग्स :nagpurनागपूर