शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

स्वप्नं दाखवली वर्ल्ड क्लासची, नागपूरचा फुटाळा गेला वेस्ट क्लासमध्ये!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 20:23 IST

Nagpur : स्वच्छता आणि देखभाल का नाही?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : फुटाळा फक्त तलाव नव्हता, तो नागपूरच्या हृदयाचा ठाव होता. सकाळी चालणं, संध्याकाळच्या गप्पा, कुटुंबासोबत निवांत वेळ... पण हे सगळं विसरून महापालिकेने विकास नावाची खेळी खेळली. तलाव परिसरात साकारलेले तब्बल १६० कोटी रुपयांची विकासकामे गेले दीड वर्षापासून धूळ खात पडून गॅलरीतील आहेत. व्ह्यू बसायच्या जागा, म्युझिकल फाउंटेन, सुंदर फूटपाथ, स्ट्रीट लाइटसह सर्व सुविधा अक्षरशः पडद्याआड गेल्या आहेत. तलावाच्या काठावर कचऱ्याचे ढीग आणि खचत चाललेल्या भिंतींमुळे या परिसराची दयनीय अवस्था झाली आहे. प्रशासन सर्वोच्च न्यायालयाने बांधकामांवर घातलेल्या बंदीचा हवाला देत देखभालीची जबाबदारी झटकत आहे.

स्वच्छता आणि देखभाल का नाही?एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने फुटाळा तलाव परिसरात नवीन बांधकामांवर बंदी घातली आहे. सध्या हा विषय न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र जाणकारांच्या मते न्यायालयाचा हवाला देत प्रशासनाने तलाव परिसराकडे पाठ फिरवली आहे.

फाउंटेन सुरू झाला की नाही?नासुप्रचा दावा आहे की, फाउंटेनचे काम पूर्ण झाले आहे. मात्र न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने तो अद्याप सुरू करण्यात आलेला नाही. मात्र तज्ज्ञांचा दावा आहे की, फाउंटेन पूर्णपणे तयारच झालेला नाही. पहिल्यांदा फाउंटेनची वायरिंग कीड लागून खराब झाली, नंतर पुन्हा वायरिंग करण्यात आल्याचे सांगण्यात आले, पण तरीही फाउंटेन नियमितपणे सुरू झालेला नाही.

खचणाऱ्या भिंती आणि कचऱ्याचे साम्राज्यफुटाळा तलाव परिसराच्या अनेक ठिकाणी भिंती खचत आहेत, काही भागांमध्ये भिंती कोसळल्याही आहेत. यामुळे अपघाताची शक्यता आहे. तलावाच्या आजूबाजूच्या भागांमध्ये कचऱ्याचे ढीग साचले आहेत आणि प्रचंड दुर्गंधी पसरलेली आहे.

कोणती विकासकामे केली ?नासुप्रने तलावाच्या मधोमध जुन्या कारंजाच्या जागी ५० कोटींचा 'म्युझिकल फाउंटन' साकारला. ११० कोटी खर्चुन महामेट्रोने व्ह्यू गॅलरी, फूटपाथ, सौंदर्गीकरण, रस्ते आणि अपूर्ण पार्किंग प्लाझा विकसित केला. फूड स्टॉल, दुकाने, आकर्षक बाक, रंगरंगोटी, सार्वजनिक शौचालयांची कामे करण्यात आली.

फाउंटेन सुरू झाला की नाही?नासुप्रचा दावा आहे की, फाउंटेनचे काम पूर्ण झाले आहे. मात्र न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने तो अद्याप सुरू करण्यात आलेला नाही. मात्र तज्ज्ञांचा दावा आहे की, फाउंटेन पूर्णपणे तयारच झालेला नाही. पहिल्यांदा फाउंटेनची वायरिंग कीड लागून खराब झाली, नंतर पुन्हा वायरिंग करण्यात आल्याचे सांगण्यात आले, पण तरीही फाउंटेन नियमितपणे सुरू झालेला नाही. 

टॅग्स :nagpurनागपूरFutala Lakeफुटाळा तलाव